India

उद्या पासून सर्व सामान्य जनतेसाठी हे महत्वाचे मोठे  बदल..!खिश्याला बसेल चाट..!जाणून घ्या काय..

उद्या पासून सर्व सामान्य जनतेसाठी हे महत्वाचे मोठे बदल..!खिश्याला बसेल चाट..!जाणून घ्या काय..

सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनात परिवर्तन घडवून आणणारे काही मोठे बदल उद्या पासून लागू होणार आहेत.उद्या म्हणजे 1 नोव्हेंबरपासून सर्वसामान्यांना ह्या बदलांना सामोरे जावे लागणार आहे.त्यात गॅस सिलेंडर पासून ते बँका,रेल्वे इ चा समावेश आहे.सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.चला तर मग हे बदल काय आहेत हे जाणून घेऊ

  • एलपीजी वितरण प्रणाली

एलपीजी गॅस सिलिंडर संबंधित 1 नोव्हेंबर 2021 पासून नवीन नियम लागू होत आहेत. गॅस सिलिंडर घरपोच येत असेल तर आता ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो OTP गॅस विक्रेत्याला सांगावा लागेल. या ओटीपीच्या आधारे एलपीजी सिलिंडर घरपोच दिला जाईल.
या नवीन बदलाला डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) असे नाव देण्यात आले आहे. सिलिंडरची डिलिव्हरी योग्य ग्राहकांपर्यंत होते किंवा नाही तसेच सिलिंडरचा काळाबाजार थांबता यावा यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. याआधी कुणाचा सिलिंडर दुसऱ्याला चढ्या किमतीत विकला जात होता, मात्र ओटीपी सुरू केल्याने या गोष्टींना आळा बसू शकेल.

  • एलपीजी किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल आणि वायूच्या किमतीत वाढ होत आहे. १ नोव्हेंबर पासून गॅस सिलिंडरच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे 6 ऑक्टोबर रोजी एलपीजीच्या किंमतीत 15 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. अनुदानित आणि विनाअनुदानित एलपीजीच्या किमती वाढवण्यात आल्या. यासह जुलैपासून 14.2 किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत एकूण 90 रुपयांची वाढ झाली आहे. आता दिल्ली आणि मुंबईमध्ये एलपीजीची किंमत 899.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे. तर कोलकात्यात तो 926 रुपये आहे.

  • रोख ठेव आणि पैसे काढण्याचे नियम

नोव्हेंबर महिन्यापासून काही बँकांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये बचत खात्यात एका महिन्यात तीनवेळा पैसे भरता येणार आहेत. तर चारवेळा पैसे काढता येणार आहेत. यापेक्षा जास्त वेळा व्यवहार केल्यास ग्राहकांना पैसे भरावे लागणार आहे. हे चार्जेस 40 रुपये प्रती ट्रॅझॅक्शन असू शकतो.

  • रेल्वे वेळापत्रक

भारतीय रेल्वे देशभरातील गाड्यांच्या वेळेत बदल करणार आहे. १ नोव्हेंबरपासून गाड्यांचे नवे वेळापत्रक लागू होणार आहे. एका अहवालानुसार, पॅसेंजर गाड्यांसोबतच मालगाड्यांचाही नव्या बदलामध्ये समावेश करण्यात आला आहे, ज्यांचे वेळापत्रक बदलू शकते. त्याचप्रमाणे देशात धावणाऱ्या सुमारे 30 राजधानी गाड्यांच्या वेळेत बदल करणे शक्य आहे.कोरोना लॉकडाऊन संपल्यानंतर, रेल्वे आपल्या गाड्यांची संख्या वाढवत आहे, परंतु ऑपरेशन अद्याप नियमित नाही. रेल्वे सध्या फक्त विशेष गाड्या चालवत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button