Amalner

रामेश्वर खुर्द या गावात आज पर्यंत झाली नाही ..विकास कामासाठी ग्राम पंचायतची वसुली,

रामेश्वर खुर्द या गावात आज पर्यंत झाली नाही ..विकास कामासाठी ग्राम पंचायतची वसुली

अमळनेर

रामेश्वर खुर्द या गावात खरोखर, विकास कामा साठी वंचित आहे. आमळनेर तालुक्यात ही एकमेव ग्राम पंचायत रामेश्वर खुर्द हि असे अनेक विकास कामा साठी वंचित आहे. कारण या गावात घर पट्टी, आणि पाणी पट्टी कधी वसुली झाली. आणि कधी वसुली झाली नाही. असे आज पर्यंत गावात समजले नाही. शासनाने सांगीतलेले आहे. की ज्या गावात ७०% पेक्षा कमी वसुली झाली असेल तर ,ग्राम सेवकावर महाराष्ट्र जिल्हा सेवा व शिस्त अधिनियम १९६४ कलम ३ व ४ अनुसार शिस्त भंगाची कारवाई केली जाते. संरपच उपसंरपच व ग्राम पंचायत सदस्य यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्या प्रक ठरणी ग्राम पंचायत अधिनियम कलम ३९(१)अंतर्गत अपात्रतेची कार्यवाही करण्यात येते. जे लोक कर भरणा करत नाही. यांच्या साठी लागू केलेले.महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम १२९ अन्वये जप्तीची कार्यवाही शासन करते. तर मग शासन अशी कारवाई रामेश्वर या गावात कधी करणार, कारणं शासनाने सागीतलेले आहे की, ज्या गावात जास्त वसुली होईल, तेवढाच विकास कामा साठी हात भार होईल, मदत होईल. ग्राम पंचायत चे सगळे कामे होतील. उदा.शौचालय, पाणी, रस्ते, लाईट दिवे, वृक्ष लावणे, आरोग्यासाठी, मुलांचे शिक्षण साठी असे विकास होतील. मग खरोखर प्रामाणिकपणे कधी होणार असा प्रश्नन उपस्थित झालेला रामेश्वर खुर्द या गावात.मणुन असे भोंगळ कारभार चालवणारे शासकीय अधिकारी कठोर कारवाई करण्यात यावी .हि मागणी रामेश्वर या गावाची ग्रामस्थ मंडळी करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button