Amalner

ही निवडणूक कशासाठी??

ही निवडणूक कशासाठी??

निवडणूका येतात आणि जातात पण साध्य काय होतं? काहीच नाही! मग लोकशाहीमध्ये आपला अधिकार काय?मतदान का करायचं? राजकीय गणिताच्या तडजोडीसाठी आपल्या भविष्याशी का मोडतोड करायची? विशिष्ट राजकीय वारसा असणाऱ्या पक्षाचा गर्भश्रीमंत माणूस का डोक्यावर घ्यायचा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी , आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी आणि युवकांच्या प्रज्वल भविष्यासाठी आपला माणूस आपला प्रतिनिधी असलाच पाहिजे…! होय….! म्हणूनच, आम्ही राजकीय सत्तेसाठी नाही तर पदवीधरांच्या सन्मानासाठी ही निवडणूक लढवणार आहोत….
पदवीधर युवकांच्या हक्कांसाठी आमच्या आग्रही मागण्या :-१) पदवीधर युवकांना गुणवत्तेनुसार सन्मानजनक काम आणि दाम मिळायलाच हवे.२) कौशल्य ज्ञानावर आधारित नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात याव्या.३) पदवीधर युवकांच्या सन्मानजनक आयुष्याची हमी विद्यापीठ आणि सरकार यांनी द्यावी.४) युवा सबलीकरण योजना सुरू करण्यात यावी.५)या योजनेअंतर्गत पदवीधर युवकांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज,तज्ञ मार्गदर्शन आणि शासकीय संरक्षण देण्यात यावे.६) कृषी व्यवसायाकडे कल असणार्या युवकांसाठी विशेष आर्थिक सहकार्याची सोय व्हावी.
७) पदवीधर युवकांना कामाचा अनुभव मिळवण्यासाठी शासकीय व खाजगी क्षेत्रात सामंजस्य करार करून पदवीधर युवकांना सुलभता प्राप्त व्हावी.
८) शिक्षकांवर लादला जाणारा अतिरिक्त जबाबदार्यांचा भार कमी करुन ज्ञानार्जनाचा मार्ग मुक्त करावा.९) निवृत्त शासकीय कर्मचारी यांना अतिरिक्त सन्मान भत्ता देण्यात यावा.१०)प्रत्येक पदवीधर युवक हा महासत्तेच्या मार्गाचा पाया आहे, त्यामुळे किमान प्रोत्साहन भत्ता म्हणून दरमहा ६००० रुपये आर्थिक सहाय्य देण्यात यावे.
11)जुनी पेन्शन योजना लागू करावी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button