Amalner

निवृत्त कर्मचाऱ्याच्या दुचाकी तुन चोरट्यांनी लांबवले एक लाख 75 हजार रुपये..!

निवृत्त कर्मचाऱ्याच्या दुचाकी तुन चोरट्यांनी लांबवले रुपये..!

अमळनेर नगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी पेन्शन धारक अशोक संदानशिव यांच्या दुचाकी च्या डिक्कीतून एक लाख 70 हजार रु भरदिवसा चोरट्यांनी लांबवले आहेत.बायकोच्या उपचारासाठी बँकेतून कर्ज काढून १ लाख ७० हजाराची रक्कम बडोदा बँकेतून काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. चोरट्यांनी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील सुभाष चौकातील महावीर इम्पोरियम जवळून डिक्कीतून पैसे चोरण्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे अमळनेर शहरात खळबळ उडाली असून आता भीतीचेही वातावरण निर्माण झाले आहे. अमळनेर तालुक्यात सतत चोरीचे प्रकार घडत आहेत. परिणामी नागरिकांमध्ये आता नाराजी बरोबरच घबराहट निर्माण झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की हिंदुस्थान बेकरी ताडेपुरा,अमळनेर येथील रहिवासी अशोक मंगल संदानशिव हे नगरपालिका येथील नोकरीतुन स्वेच्छा निवृत्ती घेऊन पेन्शनवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. बायकोच्या उपचारासाठी दोन लाख रुपये घेतलेले कर्ज खात्यावर जमा झाल्या नंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास बँक ऑफ बडोदा बँकेतून १ लाख ७५ हजार रुपये काढले. ह्या रकमेतून ५ हजार रुपये वेगळे काढून ते पॅन्टच्या खिश्यात ठेवले. उर्वरित रक्कम जवळ असलेल्या पांढऱ्या पिशवीत ठेवून ती दुचाकीच्या क्र.एमएच- १९, बीई-३६२७ डिक्कीत टाकून सुभाष चौकातील महावीर एम्पोरीयम समोर चहा घेण्यासाठी थांबले होते.चहा पिऊन परत गेल्यानंतर डिक्कीत त्यांना रक्कम व पासबुक आढळून आले नाही.500 रु चे 2,200 रु चे 2,100 रु चे 3 असे एकूण 1 लाख 75 हजार रु आढळुन आले नाही.अशोक संदानशिव यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार अमळनेर पोलीस ठाण्यात कलम 379 नुसारगुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनी राकेशसिंग परदेशी करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button