Amalner

चौबारी येथे चोरट्यांनी पुन्हा दुकान फोडले…६० हजाराचा ऐवज केला लंपास…

चौबारी येथे चोरट्यांनी पुन्हा दुकान फोडले…६० हजाराचा ऐवज केला लंपास…

अमळनेर:- तालुक्यातील चौबारी येथे तीन दिवसा आधी ५ ठिकाणी घरफोडी झाली असताना पुन्हा चोरट्यांनी दुकान फोडत ६० हजाराचा ऐवज लंपास केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चौबारी येथे संजय भागचंद जैन यांच्या मालकीचे संजय प्रोव्हिजन नावाचे किराणा मालाचे दुकान असून दि. १५ सप्टेंबर रात्री ९ ते दि. १६ रोजी सकाळी ७:३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने लोखंडी टॉमी च्या साहाय्याने शटरला लावलेले कुलूप तोडून दुकानात प्रवेश करून काउंटर ला ठेवलेले रोख रक्कम ३५ हजार तसेच २५ हजार किमतीचा तेल, साखर, साबण व इतर किराणा माल लंपास केला आहे. त्यावरून मारवड पोलिसात भादवि कलम ४५७, ३८०, ४२७ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि जयेश खलाने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. भास्कर चव्हाण हे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button