Amalner

बस स्टँड येथील चोर महिला मुद्देमाल सह पोलिसांच्या ताब्यात..!अवघ्या महिन्यात लावला तपास…

बस स्टँड येथील चोर महिला मुद्देमाल सह पोलिसांच्या ताब्यात..!अवघ्या महिन्यात लावला तपास…

अमळनेर दि.१२/०८/२०२१ रोजी सराईत चोरटया महिला यांची बालके जामनेर शहरात गर्दीच्या ठिकाणी चोरी करण्याच्या उददेशाने संशयीतरित्या फिरतांना मिळून आल्याने त्यांना जामनेर पोलीसांनी ताब्यात घेऊन बाल सुधार गृह जळगांव येथे जमा केले होते. सदर मुलींना भेटून पुढील कार्यवाही करण्यासाठी त्यांचे नातेवाईक बाल सुधारगृह जळगांव येथे आले आहेत. व त्यातील काही महिला सराईत गुन्हेगार असून त्यांनी अमळनेर बस स्टॅण्डवर चोऱ्या केल्या आहेत.

अशी माहिती पो.नि. जयपाल हिरे यांना मिळाल्याने त्यांनी दि.१४/०८/२०२१ रोजी अमळनेर पोलीस स्टेशनचे अंमलदार सुनिल कौतिक हाटकर, शरद तुकाराम पाटील, नाजीमा पिंजारी व चापोशि/ सुनिल पाटील यांचे पथक तयार करुन त्यांना शासकीय वाहनासह जळगांव येथे रवाना केले.

सदर पथकाने चोरट्या महिला १) ज्योती संतोष चव्हाण २) रेखा अफसर चव्हाण दोन्ही रा. हसनाबाद ता. भोकरदन, जि. जालना ३) सरस्वती यंतोष भोसले रा. कायगांव, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद अशांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी अमळनेर पो.स्टे. गुरनं.२८०/२०२१ भादवि कलम ३७९ मधील फिर्यादी नामे विमलबाई बन्शीलाल सोनवणे, यांचे चोरुन नेलेले रक्कम १२,०००/- रुपये पैकी १०,०००/- रुपये काढून दिल्याने ते हस्तगत करण्यात आले
आहेत. तसेच सदरील महिला पोलीस कोठडीत असतांना त्यांनी अमळनेर पो.स्टे. गुरनं.४६/२०२१ भादवि कलम ३७९ या गुन्हयाची देखील कबुली दिली असल्याने त्यांना पुन्हा गुन्हयात अटक करण्यात आली असून वरील तिन्ही महिला दि.१४/०८/२०२१ पासून आज दि.२०/०८/२०२१ रोजी पावेतो
पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहेत. गुरनं.२८०/२०२१ भादवि ३७९ या गुन्हयाचा तपास पोह/४१८ सुनिल हटकर हे करत असून व गुरनं.४६/२०२१ भादवि ३७९ या गुन्हयाचा तपास पोना/१११८ अलोक साबळे हे करत आहेत.

गेल्या 5 ते 6 महिन्यात अमळनेर बस आगार परिसरात 7 ते 8 वेळा दागिने चोरीचे प्रकार घडले आहेत.सदर महिला ह्या चोऱ्यांमध्ये देखील समाविष्ट असल्याचा पोलिसांना संशय आहे.

संबंधित लेख

Back to top button