Bollywood

ह्या भारतीय स्वप्न सुंदरींचे होते पाकिस्तानी क्रिकेटर्सशी प्रेमसंबंध..!पहा कोण आहेत ह्या जोड्या..!

ह्या भारतीय स्वप्न सुंदरींनी केले पाकिस्तानी क्रिकेटर्स शी केले लग्न

मुंबई बॉलीवूड अभिनेत्री किंवा भारतीय स्वप्न सुंदरी यांचे विविध क्रिकेटशी प्रेम संबंध राहिले आहेत. त्यातल्या त्यात पाकिस्तानी क्रिकेटर्स शी प्रेम प्रकरणे रंगली आहेत.आज जाणून घेऊ अश्या स्वप्न सुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री की ज्यांनी पाकिस्तानी क्रिकेटर्स शी लग्न केले.

१. इम्रान खान आणि झिनत अमान
इम्रान खान हा पाकिस्तान क्रिकेटचा एक प्रसिद्ध खेळाडू होता.वैशिष्ट्य पूर्ण गोलंदाजीमुळे तो खूप प्रसिद्ध होता. त्याच्या गोलंदाजीप्रमाणेच त्याचे व्यक्तिमत्व देखील खूप आकर्षक होते. ग्लॅमरस आणि बोल्ड भारतीय अभिनेत्री झिनत अमान त्याच्या प्रेमात होती.त्यांचे लग्न होऊ शकले नाही.

२. मोहसीन खान आणि रीमा रॉय
मोहसीन खान हा क्रिकेटर बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री रीमा रॉय हिच्या प्रेमात पडला आणि काही काळानंतर या दोघांनी एकमेकांशी लग्न केले. रीमा रॉय बरोबर लग्न केल्यानंतर मोहसीन खान हा चित्रपट जगताकडे वळला.
पण काही काळानंतर या दोघांचा घटस्फोट झाला आणि मोहसीन आपल्या मायदेशी पाकिस्तानात परत गेला.

३. झहीर अब्बास आणि रिटा लुथरा
झहीर अब्बास हा पाकिस्तान क्रिकेट संघतील खेळाडू आणि कर्णधार आहे. झहीर अब्बास हा रिटा लुथराला १९८० मध्ये भेटला होता.
त्यावेळी तो ग्लॉस्टरशायरसाठी खेळत होता आणि रिटा ही इंटीरीयर डिझायनिंगची विद्यार्थिनी होती. १९८८ मध्ये झहीरने रिटाशी लग्न केले. त्यानंतर रिटाने आपला धर्म बदलला आणि आता ही समिना अब्बास म्हणून ओळखली जाते. हे दोघे सध्या कराचीमध्ये राहतात.

४. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा
२०१० मध्ये सानिया मिर्झाने आपल्या लहानपणीचा मित्र सोहरब मिर्झा याचबरोबर झालेला साखरपुडा मोडला आणि तिने शोएब मलिक या पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न केले. सानियाशी त्याचे आधीपासूनच सुत जुळलेले होते. आज या निर्णयामुळे ते दोघेही सुखात आहेत.

५. वसिम अक्रम आणि सुश्मिता सेन
या दोघांची प्रेमकथा तेव्हा सुरू झाली, जेव्हा वसिम अक्रम हा भारतात प्रमोशनसाठी आणि जाहिरातींसाठी भरपूर वेळ घालवत होता. त्यावेळी त्याने फॅशन उद्योगामध्ये देखील सहभाग घेतला.
२००८ मध्ये हे दोघे एका रीअॅलिटी शोमध्ये भेटले आणि त्यानंतर ६ किंवा ७ महिने ते एकमेकां सोबत होते. सुश्मिता सेनने त्याच्याशी विवाह तर केला नाही पण ती अविवाहित मात्र राहिली.

६. तमन्ना भाटीया आणि अब्दुल रझ्झाक

तमन्नाने प्रसिद्ध क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाकच्या सहकार्याने भारत – पाकिस्तानच्या संबंधाना पुढच्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला आहे. या दोघांनी मोबाईल कंपनीसाठी एक व्यावसायिक जाहिरात केली आणि तसेच त्यांनी दुबईमधील एका दागिन्यांच्या दुकानाचे प्रमोशन देखील केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button