India

उद्या 1 सप्टेंबर पासून होतील हे आठ महत्वाचे बदल..!कुठे आर्थिक  फटका तर कुठे दिलासा..!

उद्या 1 सप्टेंबर पासून होतील हे आठ महत्वाचे बदल..!कुठे आर्थिक फटका तर कुठे दिलासा..!सप्टेंबर महिन्यापासून आता अनेक महत्वपूर्ण बाबीमध्ये बदल होणार आहे. याचा परिणाम आता सामान्य वर्गांला देखील बसणार आहे. यामध्ये आता EPF पासून चेक क्लिअरिंगच्या नियमांपर्यंतच्या सर्व नियमामध्ये बदल होणार आहे. याचा थेट परीणाम तुमच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. यामध्ये एकूण आठ नियमात बदल करण्यात आले आहे.

  • चेक क्लिअरिंग सिस्टिम

सप्टेंबरपासून 50000 रुपयांपेक्षा जास्तचा चेक जारी करण्यासाठी तुम्हाला काही नियमांचं पालन करावं लागणार आहे. बहुतांश बँकांनी पॉझिटिव्ह पे सिस्टिम (PPS) लागू करण्यास सुरुवात केली आहे. अधिकतर बँकांमध्ये 1 सप्टेंबरपासून पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू होणार आहे. देशातील एक महत्त्वाची बँक असणारी Axis Bank देखील पॉझिटिव्ह पे सिस्टिम यामहिन्यापासून लागू केलेआहे. बँकेने एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे.

  • PNB बचत खात्यावरील व्याज घटणार

पंजाब नॅशनल बँक पुढील महिन्यापासून बचत खात्यामध्ये जमा रकमेवर कपात करणार आहे. PNB च्या अधिकृत वेबसाइटवरून ही माहिती देण्यात आली आहे. बँकेचे नवीन व्याजदर 2.90 टक्के असणार आहेत, सध्या बँक बचत खात्यावरील रकमेवर 3 टक्के दराने व्याज देते. नवीन व्याजदर सध्याच्या आणि नव्या ग्राहकांना लागू होणार आहे.

  • कार इन्शुरन्सचा नियम

नवीन वाहन विकत घेणाऱ्यासाठी 1 सप्टेंबरपासून त्यावर बंपर टू बंपर इन्शुरन्स अनिवार्य असेल. हा इन्शुरन्स पाच वर्षांच्या कालावधीसाठी ड्रायव्हर, पॅसेंजर आणि गाडीच्या मालकाला कव्हर करणाऱ्या इन्शुरन्स व्यतिरिक्त असेल. बंपर टू बंपर इन्शुरन्समध्ये गाडीच्या त्या भागासाठी देखील कव्हर मिळेल ज्यावर साधारणपणे इन्शुरन्स कंपन्या कव्हर देत नाहीत.

  • PF नियमात होणार बदल

तुमचं आधार कार्ड ईपीएफ खात्याशी लिंक करणं अत्यंत आवश्यक आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना त्यांच्या UAN क्रमांकाशी आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य आहे. आधार कार्ड आणि पीएफ खातं लिंक करण्याची तारीख 1 सप्टेंबर आहे. तुमचा आधार क्रमांक यूएएनशी लिंक नसेल तर काम केल्यानंतरही तुम्ही पीएफ खात्यात पैसे जमा करू शकणार नाही.

  • ओटीटी प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन महागणार

आता Disney plus hotstar चे सब्सक्रिप्शन 1 सप्टेंबरपासून महागणार आहे. यानंतर युजर्सना बेस प्लॅनसाठी 399 ऐवजी 499 रुपये द्यावे लागतील. याशिवाय 899 च्या सब्सक्रिप्शनमध्ये ग्राहक दोन फोनमध्ये हॉटस्टार वापरु शकतील, या सब्सक्रिप्शनमध्ये एचडी क्वालिटी मिळेल. शिवाय 1499 रुपयांच्या रिचार्जमध्ये 4 स्क्रीनवर अॅप वापरता येणार आहे.

  • या अॅप्सवर येणार निर्बंध

गुगलची नवी पॉलिसीनुसार फेक कंटेट प्रमोट करणाऱ्या अॅप्सवर 1 सप्टेंबरपासून निर्बंध आणण्यात येणार आहे. अॅप डेव्हलपर्सकडून दीर्घकाळापासून न वापरण्यात येणाऱ्या अॅप्सना ब्लॉक करण्यात येईल. गूगल प्ले स्टोअरच्या नियमांना आधीपेक्षा अधिक कठोर करण्यात आले आहे. गूगल ड्राइव्ह 13 सप्टेंबर रोजी ग्राहकांना नवीन सिक्योरिटी अपडेट मिळेल, त्यामुळे याचा वापर अधिक सुरक्षित होणार आहे.

  • गॅस सिलेंडरच्या किंमती बदलणार

1 सप्टेंबरपासून LPG सिलेंडरच्या किंमती बदलू होण्यायाचा शक्यता आहे. किंवा किंमतीत बदल होतो किंवा काही वेळा दर स्थिर राहू शकतात.

  • ऑनलाइन शॉपिंग महागणार

डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढल्याने Amazon लॉजिस्टिक कॉस्टमध्ये वाढ करू शकते. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून Amazon वरून शॉपिंग करण महागणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button