Nashik

ह्या दिवशी नाशकात होईल गोळीबार..! नागरिकांना दिला इशारा..!

ह्या दिवशी नाशकात होईल गोळीबार..! नागरिकांना दिला इशारा..!

नाशिक जिल्ह्यातील काही भागात मंगळवारी, 5 ऑक्टोबर 2021 रोजी जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जनरल स्टाफ ऑफीसर ट्रेनिंग मुख्यालय तोफखाना यांच्या मार्फत देवळाली कॅम्प आर्टिलरी स्कुल तर्फे इगतपुरी व नाशिक या तालुक्यातील एक्स सेक्टर या भागात सामान्य नागरिकांना प्रवेश बंदी केली आहे.

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 06.00 ते 04.00 या कालावधीत गोळाबाराची प्रात्यक्षिके केली जातील त्या अनुषंगाने प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांनी प्रवेश करू नये असे अपर जिल्हादंडाधिकारी भागवत डोईफोडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

इगतपुरी तालुक्यातील टाकेद खुर्द, अधरवड, बेळगाव, तऱ्हाळे, सोनांशी, आडसर खुर्द, वारशिंगवणे, तळवाडी, कावाडदरा, सामनेरे, घोटी खुर्द, लहान घोटीची वाडी, नांदुरवैद्य, टाकेद बुद्रुक, धामनगाव, नांदगाव बुद्रुक, साकुर दमला, बेळगांव कुऱ्हे, मालुंजे, गंभीरवाडी, भरविर खुर्द, लहवित, अस्वली आणि नाशिक तालुक्यातील वंजारवाडी या गावाचे मुलकी हद्दीतील काही भागात तोफांच्या मारा रेषेत येत आहे. त्यामुळे संबंधित एक्स सेक्टर या गावातील नागरिकांनी प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, या क्षेत्रात जनावरांना जाऊ देऊ नये, याबाबत संबंधित गावांमध्ये जाहीर दवंडीही देण्यात आली आहे.

सूचनेचा भंग केल्यास कारवाई

प्रतिबंधित करण्यात आलेल्या क्षेत्रात प्रवेश केल्यास व्यक्तीला गंभीर इजा पोहचू शकते. एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. हे पाहता नागरिकांनी स्वतः या भागाकडे अजिबात फिरकू नये. तसेच लहान मुले आणि शेतात जाण्यासाठी गेलेल्या व्यक्तींनीही खबरदारी घ्यावी. मनाई केलेल्या वेळेत या भागात कोणी आढळल्यास व सूचनेचा भंग केल्यास त्या व्यक्तिविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हादंडाधिकाऱ्यांनी दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button