Maharashtra

बार्टी च्या गैरकारभाराबाबत उच्चस्तरीय चौकशी व्हावी- बहुजन रयत परिषदेचे प्रांतांना निवेदन

बार्टी च्या गैरकारभाराबाबत उच्चस्तरीय चौकशी व्हावी- बहुजन रयत परिषदेचे प्रांतांना निवेदनप्रतिनिधी नूरखानबाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी ही शैक्षणिक संस्था शासनाने पुण्यात सुरू केलेली असून अनुसूचित जातीतील59 प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत संधी मिळावी म्हणून सुरु करण्यात आलेल्या या संस्थेच्या कामकाजाची सीबीआय व ईडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी बहुजन रयत परिषदेने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे.बार्टी च्या गैरकारभाराबाबत उच्चस्तरीय चौकशी व्हावी- बहुजन रयत परिषदेचे प्रांतांना निवेदनसदर निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी)ही अनुसूचित जातीतील एकूण 59 जातींसाठी काम करणे अपेक्षित आहे. अनुसूचित जातीतील सर्व 59 जातींपर्यंत समता पोहोचावी,या जातीतील सर्व घटकांना समान संधी मिळावी असा उद्देश बार्टी स्थापनेमागे असतांना मात्र केवळ 1-2 जातीलाच त्याचा फायदा होत आहे.मातंग ही जात अनु.जातीमध्ये लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकाची प्रमुख जात आहे.परंतु मातंग सह इतर तत्सम जातींना या बार्टीचा लाभ अपवादानेच होत आहे.उच्च शिक्षण(M Phil,P hd),,एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, विविध व्यवसाय प्रशिक्षण या बार्टी मार्फत दिले जाते.परंतु बार्टीत एक दोन जातीचेच अधिकारी असल्याने जातीय मानसिकतेतून बार्टीत गैरकारभार केला जात आहे.बार्टी च्या गैरकारभाराबाबत उच्चस्तरीय चौकशी व्हावी- बहुजन रयत परिषदेचे प्रांतांना निवेदनत्यामुळे मातंग या जातीसह इतर तत्सम जातींना या बार्टी मार्फत समान संधी मिळत नसून इतर 57 जाती आपल्या हक्कांपासून वंचित राहत आहेत. अशी समाजाची भावना निर्माण झाली आहे.त्यामुळे मातंग समाज बार्टीवर पूर्ण नाराज असून मातंग सह इतर तत्सम जातींना समान संधी मिळून समता प्रस्थापित व्हावी म्हणून बार्टीच्या धर्तीवर आर्टी ची(अण्णाभाऊ साठे संधोधन व प्रशिक्षण संस्था) स्थापना करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शासनाने मातंग समाजास एक विशेष भेट द्यावी.तसेच बार्टीतील अधिकाऱ्यांनी व त्यांनी नेमलेल्या समतादूतांनी नियमानुसार सर्व 59 जातींसाठी काम केलंय किंवा नाही याची सीबीआय व ईडी मार्फत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे, तालुकाध्यक्ष संजय मरसाळे,शहराध्यक्ष सुरेश कांबळे,बी.एच.कांबळे,ललित बोरसे, जितेंद्र कढरे,हरिश्चंद्र कढरे सर,उमाकांत ठाकूर आदींच्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button