Kolhapur

कुटुंब आणि समाजातून माणसाची खरी जडणघडण होते.- संपतराव गायकवाड .अनिल चव्हाण लिखित जडण – घडण ‘या आत्मकथनाचे उत्साहात प्रकाशन.

कुटुंब आणि समाजातून माणसाची खरी जडणघडण होते.- संपतराव गायकवाड .अनिल चव्हाण लिखित जडण – घडण ‘या आत्मकथनाचे उत्साहात प्रकाशन.

सुभाष भोसल कोल्हापूर

कोल्हापूर : प्रत्येक माणसाच्या जडणघडणीत आपले कुटुंब आणि समाजाचे मोठे योगदान असते. बालपणात जे संस्कार होतात ते आयुष्याला दिशा देणारे ठरत असतात. आपले आई-वडील हेच आपल्या जडणघडणीचे शिल्पकार ठरतात असे भावनिक उदगार निवृत्त शिक्षण सहसंचालक संपतराव गायकवाड यांनी काढले. अनिल चव्हाण लिखित ‘ जडण-घडण ‘ या आत्मकथनाचे प्रकाशन शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे 2 मार्च 2021 रोजी संपन्न झाले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संपतराव गायकवाड बोलत होते .यावेळी त्यांनी अनिल चव्हाण यांच्या संघर्षमय व समाजाला आदर्शवत वाटचालीबाबत गौरवोद्गार काढले . ते म्हणाले ,अनिल चव्हाण यांनी आपल्या अवघ्या 48 वर्षाच्या आयुष्यात यशाची अनेक टप्पे पार केले आहेत .सुमारे दहा पुस्तकांचे लेखन ,साप्ताहिक गरुडभरारी चे मुख्य संपादक , कोजिमाशि पतसंस्थेचे संचालक ते चेअरमन, आदर्श शिक्षक, गरुडभरारी फाउंडेशन मार्फत उल्लेखनीय सामाजिक कार्य, प्रचंड लोकसंग्रह याबरोबरच संत रोहिदास सेवासंघ, शाहुवाडी पन्हाळा सेवासंघ, शिक्षक शिक्षकेतर संघ ,शिक्षकभारती संघटना ,लोकराज्य जनता पार्टी अशा अनेक संघटनांच्या माध्यमातून अनिल चव्हाण यांनी स्वतःला सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले आहे. प्रारंभी दहावी नापास झालेला व्यक्ती भविष्यात शैक्षणिक व विविध क्षेत्रात नेत्रदीपक गरुडभरारी घेऊ शकतो याचे आदर्श उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे .’जडण – घडण “या आत्मकथनातून अनिल चव्हाण यांनी आपल्या जीवनातील यश – अपयश यांच्या विविध टप्प्यांची प्रांजलपणे मांडणी केली आहे .म्हणूनच हे या आत्मकथनाला विशिष्ट उंची प्राप्त होते असे प्रतिपादन संपतराव गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते दादासाहेब लाड होते .यावेळी बोलताना दादासाहेब लाड यांनी अनिल चव्हाण यांचा प्रामाणिकपणा ,कष्टाळूवृत्ती , ध्येय, कोजिमाशि पतसंस्थेच्या सभासदात असणारी लोकप्रियता याबाबत गौरवोद्गार काढले. लेखक अनिल चव्हाण यांनी आपल्या मनोगतात आपल्या जीवनाची जडण -घडण कशी झाली याचा आढावा घेतला .आपले बालपण, शिक्षण, वैवाहिक जीवन, कौटुंबिक वातावरण, आंतरभारती शिक्षण संस्थेतील सेवा, विविध पुस्तकांचे लेखन, अनेक सामाजिक ,शैक्षणिक व राजकीय संस्था- संघटनात काम करत असताना भेटलेली जिवाभावाची माणसे यांचा आढावा म्हणजे ‘जडण- घडण ,’ हे माझे आत्मकथन आहे असे प्रतिपादन त्यांनी केले .अनिल चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या आत्मकथनाचे प्रकाशन करण्यात आले होते. रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक गरुडभरारी फाउंडेशनचे संचालक रवींद्र मोरे यांनी केले . आभार अमोल कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास ईश्वरा चव्हाण, सौ .अलका चव्हाण,जयश्री चव्हाण, विलासराव चव्हाण , कोजिमाशि पतसंस्था संचालक कैलास सुतार ,गंगाराम हजारे, सौ. सुलोचना कोळी ,जनार्दन गुरव, राजाराम भोसले, शिवाजी भोसले, सुधाकर डोनोलीकर,सुनील चव्हाण,डॉ.राजेश चव्हाण,शेतकरी संघ माजी संचालक प्रकाश पाटील, निगवे दुमालाचे माजी सरपंच सुरेश पाटील , तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button