Amalner

घराच्या कंपाउंड मधून डॉ भावे यांची बुलेट चोरी..!

घराच्या कंपाउंड मधून बुलेट चोरी..!

अमळनेर येथे चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आता तर चोरांना रात्र होण्याची अंधार पडण्याची देखील वाट पाहण्याची गरज भासत नाही. भरदिवसा तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण आता वाढत आहे. कमाल धमाल करत चोरट्यांनी घराच्या कंपाऊंडमध्ये घुसून डॉक्टरांची बुलेट चोरून नेल्याची घटना रविवारी सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास न्यू प्लॉट भागात घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की न्यू प्लॉट अमळनेर येथे वास्तव्यास असणारे भावे पॅथॉलॉजी चे डॉ. सचिन भावे यांच्या मालकीची बुलेट मोटारसायकल चोरीस गेली आहे. डॉ. मनीषा भावे यांची पॅथॉलॉजी लॅब आहे. अगदी लॅबच्या जवळ कंपाउंड मध्ये डॉ सचिन भावे यांची खाकी ग्रीन कलरची रॉयल इनफिल्ड बुलेट एमएच-१९, डीएम-७००२ ही बुलेट पार्क केली होती. चोरट्यांनी कंपाउंडमध्ये शिरून बुलेट यामुळे भर वस्तीतून सायंकाळी मोटारसायकल चोरून नेली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button