Amalner

अमळनेरात चोऱ्यांचे सत्र थांबेना..! दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दागिन्यांसह लाखोंची चोरी..!

अमळनेरात चोऱ्यांचे सत्र थांबेना..! दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये लाखोंची चोरी..

अमळनेर शहरात आज दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्या. यात लाखो रु च्या दागिन्यांची चोरी करण्यात आली आहे.तर एका वाहनातून रोख रक्कम चोरण्यात आले आहेत.

किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट, ३ हजार
लंपास केल्या दोन वेगवेगळ्या घटना रुपये किमतीची अंगठी व इतर चांदीचे
घडल्या.
दागिने असे एकूण १ लाख २ हजार
मारवड येथील योगेश आधार पाटील हे पत्नी व मुलीसह चांदीचे दागिने मोडण्यासाठी गुरुवारी अमळनेर येथे आले होते.उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी ते तहसिल कार्यालयात आले असताना तलाठी कार्यालयाजवळ कार पार्क करून त्यावेळी त्यांची पत्नी वाहन क्रमांक एमएच १९ बी ९९८९ रोहिणी हिची पर्स कारमध्येच ठेवली व ते तलाठी कार्यालयात गेले.दुपारी अडीचच्या सुमारास परत आल्यानंतर त्यांना कारचा दरवाजा उघडा दिसला. आतमध्ये पाहिले असता त्यांच्या पर्समधील १५ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅमचे सोन्याचे कानातले, ४५ हजार रुपये किमतीची
१५ ग्रॅमची पोत, १२ हजाराची ४ ग्रॅमची लहान माळ, १५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅमचची साखळी, ९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट, ३ हजार किमतीची अंगठी व इतर चांदीचे दागिने असे एकूण 1 लाख 2000 रु किंमतीचे दागिने चोराने लंपास केले आहेत. याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी शरीफखान पठाण तपास करीत आहेत.

तर दुसऱ्या घटनेत अमलेश्वरनगरमधील नीलेश
रघुनाथ महाजन हा २७ला त्याचा भाऊ दिनेश रघुनाथ महाजन याच्यासह दुचाकी वाहन क्र एमएच १९ एए ४०१९ वर कुरकुरे विकायला गेला होता. तांबेपुरा मार्गे परतत असताना चोरट्याने त्यांच्या वाहनातील १३ हजार रुपये लंपास केले. नीलेशच्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button