Kolhapur

श्री सिद्धेश्वर दूध संस्थेचे कामकाज आदर्शवत- आमदार जयंत आसगावकर

श्री सिद्धेश्वर दूध संस्थेचे कामकाज आदर्शवत- आमदार जयंत आसगावकर
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर ; सिद्धनेर्ली ता. कागल येथे सिद्धेश्वर दूध संस्थेने दूध उत्पादकांसाठी राबवलेले अनेक विविध योजना, सभासद व कामगार कल्याणासाठी चे धोरण आदर्शवत व अनुकरणीय असल्याचे मत आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केले.ते श्री सिद्धेश्वर दूध संस्थेच्या सदिच्छा भेटी प्रसंगी बोलत होते.यावेळी संस्थेचे चेअरमन संजय येवलुजे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संचालक व्ही.जी.पोवार यांनी केले.
यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन शिवाजी बी.मगदूम,संचालक तानाजी पाटील,राघू हजारे,सुभाष पाटील,अरविंद पाटील,मधुकर आगळे,दादोबा गोनुगडे,सेक्रेटरी चंदर मगदूम,कर्मचारी व दुध उत्पादक सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.यावेळी आभार संदीप गुरव यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button