sawada

सावद्यात पिर मंजनशाहा दर्गा व पंजाब बँक जवळ नवीन वळण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे…!

सावद्यात पिर मंजनशाहा दर्गा व पंजाब बँक जवळ नवीन वळण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे…!

ठळक मुद्दे

५ महिन्यातच बांधलेल्या वळण रस्त्याचे झाले तिन- तेरा

सदरील कामासाठी काढली होती १० लाख रुपयेची निविदा

सदरच्या कामाकडे न.पा. बांधकाम अभियंता व सहाय्यक अभियंता यांचेही दुर्लक्ष

सदरील प्रकरणाकडे मुख्याधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पालिकेच्या हद्दीत पंजाब नॅशनल बँक व पिर मंजनशाहा दर्गा समोरील रस्ता अतिशय अरुंद होता. या रस्त्याचा वळण कोपरा मोठा करण्याकामी पालिकेने सुमारे दहा लाख रुपये खर्च ची निविदा काढलेली होती. हा काम एका ठेकेदाराला मिळालेला होता. मात्र सदर चे काम उत्कृष्ट व टिकाऊ ऐवजी अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने सदर रस्त्यांचे पाच महिन्यातच तीन तेरा वाजलेले आहे. काम सुरू असताना पालिकेतील बांधकाम अभियंता व सहाय्यक अभियंता यांनीसुद्धा वेळीच लक्ष दिले असते तर सदरचा काम निकृष्ट दर्जाच्या झाला नसता तसेच ठेकेदारांनी त्याची मनमानी यावेळी केली नसती हे मात्र खरे आहे.

फक्त छायाचित्रात दिसत असलेल्या वळण रस्त्याचा भागावर १० लाख रुपये खर्च झाले असून ही रस्ता अवघ्या काही महिन्यातच उघडण्यास सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी स्पष्टपणे गिट्टी वर आलेली दिसत आहे. यादरम्यान पालिकेकडून ठेकेदाराला त्याचे देयक देखील अदा करण्यात आले आहेत. पालिका प्रशासनाने सदरचे निकृष्ट दर्जाचे तयार केलेला वळण रस्ता पुन्हा गुणवंता पूर्वक तयार करून घेतल्याशिवाय ठेकेदार यांची सुरक्षा अनामत अदा करू नये असे नागरिकाकडून बोलले जात आहे.

सदरील प्रकरणाकडे सध्या पालिकेला लाभलेले कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी स्वतः लक्ष देऊन नियमानुसार घटनास्थळाची पाहणी करून ठेकेदार सह संबंधित दोषींवर काय ठोस कारवाई करतील याकडे गावातील सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button