Nashik

मडकीजांब तंटामुक्त गाव समितीचे कार्य कौतुकास्पद – सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.लोखंडे साहेब

मडकीजांब तंटामुक्त गाव समितीचे कार्य कौतुकास्पद – सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.लोखंडे साहेब

सुनिल घुमरे नाशिक प्रतिनिधी

मडकीजांब- दि. १०
_दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची बैठक आज पार पडली. मडकीजांब तंटामुक्त गाव समितीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन दिंडोरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. लोखंडे साहेब यांनी मडकीजांब येथे बोलताना केले._

_त्यांच्यासमवेत पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री. कावळे साहेब, श्री. अमोल पवार साहेब, श्री. एस.के.जाधव, पोलीस हवालदार आदी अधिकारी उपस्थित होते._

_पुढे बोलताना लोखंडे साहेब यांनी सांगितले की, वादामुळे वादी व प्रतिवादी या दोघांचेही नुकसान होते गावातील वाद गावातच जर मिटले तर वेळ व पैशांची बचत होते. मानसिक स्वास्थ टिकवण्यासाठी वाद, मतभेद कायमस्वरूपी मिटवावेत. लहान मुलांवर, विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होण्यासाठी गावात चांगले वाचनालय असावे अशी अपेक्षा श्री लोखंडे साहेब यांनी व्यक्त केली._

यावेळी उपनिरीक्षक श्री.कावळे साहेब व उपनिरीक्षक श्री. अमोल पवार यांनीही मनोगत व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

_मडकीजांब पोलीस पाटील सौ.रोहिणी वडजे यांनी प्रास्ताविक केले. तंटामुक्त गाव समितीचे पदाधिकारी माजी अध्यक्ष रघुनाथ जगताप निवृत्ती बोराडे, बाळासाहेब धुमणे, जितेंद्र वडजे यांनी पोलीस अधिकाऱ्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले._

_तंटामुक्त गाव समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी श्री. साहेबराव वडजे यांची निवड झाल्याबद्दल श्री. लोखंडे साहेब यांचे हस्ते सत्कार करण्यात आला तसेच उपाध्यक्षपदी श्री.विजय तुकाराम वडजे यांची निवड झाल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक श्री कावळे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला._

_व्यासपीठावर वि.का. सोसायटी संचालक श्री सचिन वडजे तलाठी मेढे तात्या, ग्रामसेवक श्री.समाधान शेवाळे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर एच अहिरे, माजी ग्रा.प. सदस्य कैलास गायकवाड, दुध सोसायटी चेअरमन सुनिल सोमवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते._

_याप्रसंगी इ.१०वीच्या विदयार्थ्याच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला._

_कार्यक्रमाचे सुत्र संचालन सचिन वडजे यांनी केले. आभार तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. साहेबराव वडजे यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button