Pune

गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव रागिनी फाउंडेशन आणि सौभाग्य होलसेल साडी डेपो यांच्या वतीने आयोजन

गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव रागिनी फाउंडेशन आणि सौभाग्य होलसेल साडी डेपो यांच्या वतीने आयोजन

दत्ता पारेकर पुणे

पुणे : रागिनी फाउंडेशन आणि सौभाग्य होलसेल साडी डेपो आयोजित गौरी गणपती सजावट महाराष्ट्र स्पर्धेतील विजेत्यांना बारामती येथील सौभाग्य होलसेल साडी डेपो या ठिकाणी रागिनी फाउंडेशन च्या अध्यक्षा राजश्री अगम अगम आणि सौभाग्य होलसेल साडी डेपो चे संचालक सदस्य श्री अशोकराव चव्हाण ,श्री आप्पासाहेब भोसले सौ नंदा भोसले ,सौ अस्मिता कोकरे ,श्री अनिल कोकरे ,श्री राहुल चव्हाण, श्री संतोष बांदल,श्री विवेक भोसले यांच्या हस्ते गौरविण्यात आले .675 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला महिलांमध्ये असलेल्या कलागुणांना व त्यांच्या मधील कल्पकतेला वाव मिळावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रागिनी फाउंडेशनचे अध्यक्षा राजश्री अगम यांनी दिली प्रथम क्रमांक: सौ शुभांगी पवार माळेगाव ,दुसरा: क्रमांक कु. अमृता तंटक कुरोली, तृतीय क्रमांक: सौ स्वाती सस्ते माळेगाव, उत्तेजनार्थ क्रमांक 1 :सौ पुनम रणदिवे फलटण उत्तेजनार्थ क्रमांक 2: सौ वंदना तोडकर मंगळवेढा, विशेष आकर्षण 1: सौ राजेश्री धुमाळ सुपे, विशेष आकर्षण 2 : सौ अंजली गोडसे सातारा यांचा विशेष सन्मान यावेळी सौभाग्य होलसेल साडी डेपो चे संचालक राहुल चव्हाण ,विवेक भोसले, अनिल कोकरे ,संतोष बांदल यांच्या हस्ते करण्यात आला सर्वांचा भरगोस प्रतिसाद आणि उपस्थिती यामुळे मोठ्या उत्साहात ही स्पर्धा पार पडली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button