Faijpur

फैजपूर नगर परिषदेच्या आगामी काळात होणार्या निवडणुकीचे वारे वाहू लागले

फैजपूर नगर परिषदेच्या आगामी काळात होणार्या निवडणुकीचे वारे वाहू लागले

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर

फैजपूर नगरपरिषदची निवडणूक येत्या आगामी काळात होणार्या नगरपरिषद निवडणुकीचे चिन्हं असून दिग्गजांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे या वेळेस वॉर्ड नुसार एक नगरसेवक निवडला जाणार असल्याचे शासनाच्या धोरणानुसार प्रक्रिया पार पडणार आहे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग प्रमाणे तीन नगरसेवक आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणूक झाली होती मात्र या वेळेस आघाडी शासनाच्या धोरणानुसार वार्ड नुसार एक नगरसेवक निवडला जाणार आहे आणि जे नगरसेवक निवडून येतील त्यामधून नगराध्यक्ष प्रक्रिया पार पडणार असल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे फैजपुरातील नगरपरिषदेच्या निवडणुकीचे आतापासून वारे वाहू लागले असून अनेक हौशे नौशे जरी इच्छुक आहे तरी सुद्धा नगर पालिकेत परंपरागत दिग्गजांच्या पराभव करणे सोपे नाही नगरपरिषदेच्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत माजी नगराध्यक्ष मिलिंद शंकरराव वाघुळदे यांची परंपरा राहिलेल्या या नगरपालिकेत त्यांचे आजोबा माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष कैलासवासी बळीराम बापू वाघुळदे तसेच त्यांचे वडील कैलासवासी शंकरराव वाघुळदे हेसुद्धा लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आले होते सतत त्यांची परंपरा सांभाळणारे शहरातील मावळते माजी नगराध्यक्ष त्यांचे पुत्र विद्यमान नगरसेवक मिलिंद शंकरराव वाघुळदे ऊर्फ बापू हे सातत्याने चार वेळा नगरपालिकेवर निवडून आलेले आहे दोन वेळा नगराध्यक्षपद संयमपणे सांभाळणारे ते एकमेव नगराध्यक्ष ठरले आहे फैजपूर शहरातील दिग्गज नगरसेवकांमध्ये आजी माजी नगराध्यक्ष तसेच नगरसेवक माजी नगराध्यक्ष नीलेश राणे ऊर्फ पिंटू यांनीसुद्धा दोन वेळा यशस्वीपणे नगराध्यक्षपद सांभाळलेले आहे हेमराज चौधरी ऊर्फ डॉलु शेठ हेसुद्धा सातत्याने पालिकेवर निवडून येत आहे नगरसेवक शेख कुर्बान कलीम खा मणियार नगरसेवक केतन किरंगे महेबूब पिंजारी हे आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक फैजपूर शहरात तरी दिग्गज मानले जात आहे तसेच शहरातील अल्पशा काळात मोठय़ा प्रमाणावर लोकप्रिय झालेले राजू तडवी इंजिनीयर यांच्या पाठिशी कार्यकर्त्यांची मोठी फळी असल्यामुळे ते सुद्धा दिग्गज मानले जात आहे संभाव्य आगामी काळा मध्ये होणार्या नगर परिषदेच्या निवडणुकीत जरी हौशे नौशे निवडणुकीत तयारी करीत असले तरी त्यांना या दिग्गजांशी सामना करावा लागणार आहे तर नगर परिषदेची निवडणूक काय आहे हे त्यांना मात्र वेळ सांगू शकेल अशी सुद्धा चर्चा सुरूअसून त्यामुळे आता फैजपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याचे चित्र आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button