Kolhapur

बायकोची “ती” इच्छा पूर्ण न केल्याने बायकोने उचलले धक्कादायक पाऊल…

बायकोची “ती” इच्छा पूर्ण न केल्याने बायकोने उचलले धक्कादायक पाऊल...

रोजच आयुष्यात वेगवेगळ्या धक्कादायक घटना घडत असतात.कोल्हापूर मध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने बायकोला टच स्क्रीन मोबाइल घेऊन न दिल्याने 19 वर्षीय विवाहित महिलेने अत्यंत धक्कादायक पाऊल उचलले.मोबाईल न मिळाल्यामुळे तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यात ही घटना घडली असून पन्हाळा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
सविस्तर माहिती अशी की फिर्यादी वैभव लोकरे यांचा एक वर्षांपूर्वी प्रियांका नावाच्या मुलीशी विवाह झाला होता. वैभव हा हात मजूर असून परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. कोरोनात आर्थिक परिस्थिती आणखीनच खालावली त्यामुळे खूप दिवसापासून पत्नी हट्ट करत असून देखील वैभव स्मार्ट फोन ची मागणी पूर्ण करणे शक्य झाले नाही.
प्रियांका वैभव लोकरेने नैराश्यातून सोमवारी दुपारी घरात कुणी नसताना आपल्या राहत्या घरातील छताच्या छतास नॉयलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली . फक्त टच स्क्रीन मोबाइल न मिळाल्याने महिलेनं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पती वैभव यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी फिर्यादीचा जबाब नोंदवून घेतला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button