सावदा शहराचे सुपरिचित व्यक्तिमत्व गेले काळाच्या पडद्याआड.
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील रहिवासी कै.दगडू सुकलाल चौधरी उर्फ मामा ही व्यक्ती शहर व परिसरात मामा म्हणून सुप्रसिद्ध होते.तरी त्यांचे दि.४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाल्याची घटना घडली आहे.
मामा हे मुळचे शिरसोली ता.जि.जळगांव येथील रहिवासी होते.पंरतु कामा धंद्यासाठी सरासरी ५० वर्षपेक्षा अधिक कालावधी पासून सावदा येथे कायमचे स्थायिक झाली. त्यांचा सावदा फैजपूर रोडावर खानावळ हॉटेलचा व्यवसाय होता.त्यांच्या खानावळ मध्ये शहरासह परिसरातील कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती त्यांच्याजवळ पैसे असो किंवा नसो जेवण केल्यानंतर शिलकी जेवढे पैसे ग्राहकाकडे असतील तेवढे पैसे देऊन तो पोटभर जेवण केल्यानंतर मामा एवढे बोलून बिंदास मार्गग्रस्त होत असतो. तसेच त्यांच्या जवळ येणाऱ्या गरीब लोकांना त्यांनी त्यांच्या परीने अर्थसाहाय्य करीत होते.अशी व्यक्ती प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाल्याने त्यांच्याकडील कामगार कर्मचारी सध्यातरी पोरका झालेला असून तरी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला दिसून येते.शहरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात ३ मुलं २ मुली सुना,जावई नातवंडे आहे.