Amalner

Amalner: पातोंडा येथील ग्रामसेवक करताय नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष.

पातोंडा येथील ग्रामसेवक करताय नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष.

अमोल मुसळे यांच्या तळघरात साचले आहे ५ते ६फूट घाण पाणी

अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील अमोल मुसळे यांचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वतःच्या मालकीचे घर आहे. तसे घर पुरातन असून राहण्या योग्य आहे. ग्रामपंचायतला त्यांनी दिनांक 23 जानेवारीपासून दोन वेळेस तक्रार अर्ज दिलेला आहे. त्या तक्रारीनुसार मुसळे यांच्या घराच्या तळमल्यात पाच ते सहा फूट पाणी साचते. तळघरात साचलेले पाणी ते दिवसातून दोन वेळेस मोटर लावून काढतात. त्यांना त्या साचलेल्या घाण पाण्याचा तिथे खूप त्रास होत आहे.त्यातून त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागलेले आहे .ग्रामपंचायत त्यांना कुठलेही सहकार्य करीत नाही. ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक त्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात आणि आमच्या ग्रामपंचायतकडे पैसे नसून तुम्ही काम करून घ्यावेत आमच्याकडे पैसे आल्यानंतर तुम्हाला पैसे दिले जातील. अशी उत्तरे देऊन त्यांच्या तक्रारीची दखल घेत नाही. या गोष्टीला कंटाळून अमोल मुसळे यांनी ग्रामविकास अधिकारी, तहसीलदार साहेब, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली आहे. त्यांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे .जर कुठेही न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या महाराष्ट्र दिनाला आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button