Sakri

अवैधरित्या दारू बनविणाऱ्या तिघांच्या धुळे स्थानिक अन्वेषण विभागाच्या पथकाने आवळल्या मुसक्या

अवैधरित्या दारू बनविणाऱ्या तिघांच्या धुळे स्थानिक अन्वेषण विभागाच्या पथकाने आवळल्या मुसक्या

अजहर पठाण साक्री

साक्री : साक्री तालुक्यातील शेवाळी- दातर्ती याठिकाणी मंगेश बाविस्कर नावाचा व्यक्ती स्पिरिट्स व आणखी घातक रसायन मिश्रित करून अवैधरित्या बनावट दारू तयार करत असल्याची माहिती धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास माहिती दाराकडून मिळाल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी बुधवंत यांनी तात्काळ यासंदर्भात पथक तयार करून माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला असता
संबंधित व्यक्ती आपल्या दोन साथीदारांसह बनावट दारू तयार करीत असताना पोलिसांना आढळून आला या कारवाईमध्ये तिघा जणांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून तब्बल दोन लाख 64 हजार पेक्षा जास्तीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
या कारवाई दरम्यान ताब्यात घेतला एका सौंशयितांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाई ची संपूर्ण माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. अझर पठाण धुळे,

Leave a Reply

Back to top button