Amalner

दगडी दरवाजा कोसळला..!ऐतिहासिक दरवाजाची स्थिती ना घर का ना घाट का..!न प सुस्तीत की मस्तीत…!

दगडी दरवाजा कोसळला..!दरवाजाची स्थिती ना घर का ना घाट का..!न प सुस्तीत की मस्तीत…!

अमळनेर ची ऐतिहासिक शान वारसा म्हणून अमळनेर दगडी दरवाजा ओळखला जात होता.हा दगडी दरवाजा अमळनेर ची अस्मिता आणि एक प्राचीन ओळख होती.परंतु पुरातत्व खात्याने केलेले दुर्लक्ष मुळे ह्या दरवाजाची पडझड दोन वर्षांपासून सुरु आहे.ह्या बाबतीत अमळनेर येथील सुजाण नागरीक,सामाजिक कार्यकर्ते यांनी वारंवार प्रशासनास लेखी तक्रारी केल्या होत्या पण याकडे संपूर्ण पणे दुर्लक्ष केल्या मुळे आज अतिशय वाईट अवस्था दरवाजाची झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शहर व तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. दरवाजाचे काम अपूर्ण अवस्थेत असून पडझड सुरूच आहे. आज पुन्हा दरवाजाचा काही भाग कोसळला आहे.संध्याकाळी काही ठिकाणची माती ढासळली होती तर आताच मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा काही भाग ढासळला आहे दरम्यान दगडी दरवाजा पुनर्निर्माण समितीने अमळनेर न प मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता उद्या या संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button