Pune

मावळ येथे प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी त्यांना स्वतंत्र कक्ष रुम ची व्यवस्था करण्याची मागणी – ट्रायबल फोरम

मावळ येथे प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी त्यांना स्वतंत्र कक्ष रुम ची व्यवस्था करण्याची मागणी – ट्रायबल फोरम

पुणे : प्रतिनिधी दिलीप आंबवणे

ट्रायबल फोरम मावळ यांच्या वतीने पंचायत समिती सभापती ज्योतीताई शिंदे, गट विकास आधिकारी भागवत साहेब, कक्षाधिकारी भोईर यांना संघटनेच्या वतीने निवेदन देऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव येथून जे अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी येतात त्यांना स्वतंत्र कक्ष रुम ची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली
या प्रसंगी आदिवासी सेल राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष – युवा अध्यक्ष ट्रायबल फोरम पुणे जिल्हा विक्रम हेमाडे,
किवळे कशाळचे सरपंच पुणे विभागीय उपाध्यक्ष मारुती खामकर गुरुजी, माजी आदर्श सरपंच वडेश्वर जिल्हा उपाध्यक्ष गुलाब गभाले, ट्रायबल फोरम मावळचे अध्यक्ष कांताराम असवले, खांडीचे सरपंच उपाध्यक्ष अनंता पावशे, सावळाचे सरपंच मार्गदर्शक नामदेव गोंटे,
माजी सरपंच माळेगाव बु आंदर मावळ विभागीय अध्यक्ष राजेश कोकाटे, तसेच अनिल गवारी कार्याध्यक्ष, किसन गवारी विभागीय अध्यक्ष, तानाजी पिचड, हिरामण हेमाडे, मधुकर कोकाटे प्रसिद्ध प्रमुख इत्यादी संघटना कार्यकर्ते उपस्थितीत होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button