Nashik

ञिरश्मी बुद्ध लेणीच्या खाजगीकरणाला समाजाने विरोध करावा अन्यथा बौद्धांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान करु नये…. सुप्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड यांचे आवाहन

ञिरश्मी बुद्ध लेणीच्या खाजगीकरणाला समाजाने विरोध करावा अन्यथा बौद्धांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान करु नये…. सुप्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड यांचे आवाहन

शांताराम दुनबळे

नाशिक : नाशिक शहरातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे आणि भारतीय बौध्दांची अस्मिता जागृत ठेवणारे धार्मिक स्थळ म्हणजे *” त्रिरश्मी बुध्दलेणी “* ह्या बुध्दलेणी लेणीच्या पायथ्याला “बुध्दस्मारक” महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आले. त्यालगतच काही एकर जागेवर *चित्रपट निर्माते दादासाहेब फाळके स्मारक* देखील नाशिक जिल्ह्यातील बौध्द जनतेचा प्रखर विरोध असतानाही नाशिक महानगरपालिका यांच्या वतीने उभारण्यात आले. *सुदैवाने ते दादासाहेब फाळके स्मारक कालांतराने बंद पडले* त्याचे कारण की बौध्द धम्म हा जगातील सर्वात मोठा शांततेचा प्रतिक म्हणून ओळखला जाणारा धम्म आहे नाशिकच्या महानगरपालिकेने नाशिक शहरातील शांतता भंग करण्यासाठी च बौध्द धम्माच्या अस्मितेला सुरुंग लावण्यासाठी *”त्रिरश्मी बुध्दलेणी”* ह्या लेणीच्या पायथ्याला दादासाहेब *फाळके स्मारक उभारण्याचा डाव आखला* पंरतु तो डाव काही वर्षापासून फसलेल्या अवस्थेत दिसून येत आहे.
म्हणून फाळके स्मारकाची झालेली पडझड व महानगरपालिकेचे झालेले दुर्लक्ष यामध्ये भारतीय बौद्धांची अस्मिता व *धार्मिक स्थळ बौध्द स्मारक”* या स्मारकाकडे देखील मुजोर महानगरपालिकेच्या कर्मचारी /अधिकारी / नगरसेवक /महापौर / विभागीय अधिकारी /महापालिका आयुक्तांनी जाणुन बुजून दुर्लक्ष केले आहे. *आज तेच बौध्द स्मारक धुळ खात पडलेल्या अवस्थेत* आहे. नाशिक महानगरपालिकेने बौध्द स्मारकाची आजपर्यंत…ना रंगरंगोटी केली आहे…ना..तेथील परिसराची स्वच्छता केली आहे… ना..रोषणाई केली आहे..सर्व शुकशुकाट व रात्री च्या वेळी अंधकारमय वातावरण निर्माण झाले आहे.. त्यातल्या त्यात नव्यानेच आता मुंबईतील एका खाजगी संस्थेला BOT अंतर्गत व्यवस्थापन करण्यासाठी ताबा देण्याचा प्रयत्न* नाशिक महानगरपालिका मोठया प्रमाणावर करीत आहे…
महानगरपालिकेच्या ह्या BOT व्यवस्थापनेला कदाचित *नाशिक मधील नगरसेवक / महापौर / आमदार / खासदार* अशा लोकप्रतिनिधी यांची मुकसंमती तर नसावी ना.असा गंभीर प्रश्न आजमितीस बौध्द जनतेला पडलेला आहे. कुणीही याविषयी बोलायला तयार नाही कुणीही *बौध्दांच्या भावनेचा आदर* करायला तयार नाही महानगरपालिकेच्या *मनमानी कारभाराकडे लक्ष* द्यायला तयार नाही निवडून येण्यासाठी *बौध्द जनतेचे मतदान चालते* मात्र बौध्द जनतेचे अस्मिता असलेल्या *धार्मिक स्थळाचे खाजगीकरण होताना उघडया डोळयाने बघून सुध्दा राजकीय पक्ष व नगरसेवक /महापौर /आमदार / खासदार मंडळी डोळझाक पणा करीत असेल* तर याला काय म्हणायचे…??
बौध्दांच्या धार्मिक स्थळाकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच पर्यायाने बौद्ध समाजाच्या भावनेचा अनादर करणे… असाच सरळसरळ अर्थ निघतो आहे…. आणि म्हणूनच आगामी काळात *नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत* बौध्दांनी बौध्द समाजाचा अनादर करणारे राजकीय पक्षाला आपले अनमोल मतदान करु नये.
वामनदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली *त्रिरश्मी बुध्दलेणी तथा बौध्द स्मारक बचाव समिती* स्थापन करण्यात आली आहे… या समिती च्या आंदोलनात सर्व *बौध्द नवतरुण युवक-युवती – महिला – पुरुष* यांनी आज जागृतपणे सहभागी व्हावे…. *आणि*… आगामी महानगरपालिका निवडणुकीत बौध्द स्मारकाकडे दुर्लक्ष करून मुंबई च्या खाजगी संस्थेला व्यवस्थापन करण्यासाठी मुकसंमती देणारे राजकीय पक्ष यांना आपण आपले अनमोल मत देवु नये… असे “जाहीर आवाहन” *महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती* ह्या राज्यव्यापी कलावंत संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे…. असे पत्रक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गायक सोमनाथ गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button