Nashik

धक्कादायक..बापानेच केला मुलीवर बलात्कार शिक्षिकेच्या तक्रारीवरून झाले उघड

धक्कादायक घटना, बापानेच केला मुलीवर बलात्कार शिक्षिकेच्या तक्रारीवरून झाले उघड

नासिक शांताराम दुनबळे

नाशिक=बापाने स्वतःच्या शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीआहे शाळा उघडताच मुलीने शिक्षकाकडे आपबिती कथन केली त्यामुळे हा सर्व प्रकार शिक्षिका मुळे पोलिसांपर्यंत पोचला आहे शिक्षिकेने अभोणा तालुका कळवण पोलिस ठाण्यात तक्रार दिली मात्र हा प्रकार नाशिक शहरात घडला असल्याने हा गुन्हा नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळवण तालुक्यातील एका आश्रम शाळेच्या याप्रकरणी तक्रार दाखल केली अल्पवयीन पीडिता कळवण तालुक्यातील एका शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत शिक्षण घेत आहे ही पीडिता१६ डिसेंबर२०२१ ते ४ जानेवारी २०२२ यादरम्यान शाळेला सुट्टी असल्याने डोंगऱ्या देव महोत्सव निमित्त नाशिकमध्ये स्थित पित्याकडे वास्तव्यास आली यावेळी बापाने तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे डोंगऱ्या देव महोत्सवानिमित्त आदिवासी विकास विभागाच्या वतीने आश्रम शाळेला सुट्टी देण्यात येते या काळात मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले होते संशयित बापाने या काळात घरात कोणी नसताना मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा उचलत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला ही बाब शाळा सुरू होतात पीडितेने आपल्या शिक्षककडे कथन केली त्यानंतर हा प्रकार पोलिसात पोहोचला आहे शिक्षकांनी आपल्या वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली त्यानंतर पीडितेने आई आणि मामाला सोबत घेत शिक्षक यांनी कळवण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली हा गुन्हा भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत तक्रार वर्ग करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक निरीक्षक प्रणिता पवार करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button