Amalner

स्वयंघोषित भूमिपुत्र आमदार यांनी शेतात जाणाऱ्या रस्त्यांवर लक्ष केंद्रित करावे शेतकऱ्यांनी व्यक्त केली खंत

स्वयंघोषित भूमिपुत्र आमदार यांनी शेतात जाणाऱ्या रस्त्यांवर लक्ष केंद्रित करावे शेतकऱ्यांनी व्यक्त केली खंत

अमळनेर विधान सभा रणांगण महाराष्ट्र भर गाजलं परंतु विकासात मात्र मागे राहील. गांधीजी यांनी जो मंत्र दिला “खेड्याकडे चला” बहुतेक त्याचा विसर भूमी पुत्र आमदार यांना पडला असावा.निवडणुकीत स्वतः ला भूमिपुत्र म्हणुन पदवी बहाल करणारे आमदार यांनी शेतात जाणारे रस्त्यांवर लक्ष केंद्रीत करावे,अशी अपेक्षा कोळपिंप्री गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. दरवर्षी पाऊस सुरू झाला की मधली शिवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या रस्त्यांवर शेतकऱ्यांना पायी चालण मुश्किल होत.गाड बैल सुधा ह्या रस्त्यावरून जात नाहीत परंतु शेतातील कामा साठी जाताना ह्या रस्त्यावर शेतकऱ्याना तारेवरची कसरत करावी लागते,आता तरी भूमिपुत्र यांनी गांभीर्याने या गोष्टी कडे लक्ष द्यावे अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button