Amalner

नागपूर आकाशवाणी केंद्रावर शाळा बाहेरची शाळा ह्या कार्यक्रमात पिंगळवाडे येथील सर्वज्ञ ची निवड..!

नागपूर आकाशवाणी केंद्रावर शाळा बाहेरची शाळा ह्या कार्यक्रमात पिंगळवाडे येथील सर्वज्ञ ची निवड..!

अमळनेर येथील पिंगळवाडे ह्या छोट्या गावातील सर्वज्ञ देशमुख ची नागपूर आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारित होणाऱ्या शाळा बाहेरची शाळा या कार्यक्रमाच्या 211 व्या भागासाठी निवड झाली आहे. जळगाव जिल्ह्यातून जि.प.पिंगळवाडे शाळेचा विद्यार्थी सर्वज्ञ हा एकमेव विद्यार्थी आहे.
गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन यांच्या प्रोत्साहनामुळे पिंगळवाडे शाळेला हा बहुमान मिळाला असे तंत्रस्नेही शिक्षक तथा शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे यांनी सांगितले. सर्वज्ञला यासाठी अमळगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी.धनगर, अमळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुके, मुख्याध्यापक दत्तात्रय
सोनवणे, शाळेतील शिक्षक प्रविण पाटील, रविंद्र पाटील व वंदना सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वज्ञ व त्याच्या आई-वडीलांचे जळगाव जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी .डॉ.पंकज आशिया,प्राथ शिक्षण अधिकारी विकास पाटील, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र महाजन गावातील सरपंच,उपसरपंच, ग्रामस्थ इ चे सहकार्य सर्वज्ञ ला लाभले. सर्वज्ञ चे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सर्वज्ञ चा आकाशवाणीचा हा भाग दि 21 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 वाजून 30 मि नी प्रसारित होईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button