Ahamdanagar

वाघोली येथे दत्तक्रुपा क्रुषीप्रोड्युसर कंपनीच्या दुसऱ्या शाखा कार्यालयाचे उदघाटन थाटात संपन्न ?

वाघोली येथे दत्तक्रुपा क्रुषीप्रोड्युसर कंपनीच्या दुसऱ्या शाखा कार्यालयाचे उदघाटन थाटात संपन्न ?

सुनिल नजन

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील दत्त क्रुपा क्रुषीप्रोड्युसर कंपनीच्या दुसऱ्या शाखेचे उदघाटन थाटात संपन्न झाले. या कार्यालयात दत्त क्रुपा क्रुषीसेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र या तिन फर्मचा समावेश आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माळेगाव नेच्या शिवशक्ती मिल्क & आँईल इंडस्ट्रीजचे संचालक जगन्नाथ पाटील गावडे, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक आणि जेष्ठ नेते निव्रुत्ति पाटील दातीर हे उपस्थित होते.प्रथम दत्तक्रुपा क्रुषीप्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयाचे उदघाटन ह.भ.प.बाळक्रुष्ण महाराज भोंदे यांच्या हस्ते, दत्तक्रुपा क्रुषीसेवा केंद्राचे उदघाटन प्रसिद्ध उद्योजक जनशक्ती टेक्स्टाईल मिलचे अध्यक्ष अँडव्होकेट शिवाजीराव काकडे यांच्या हस्ते, आणि आपले सरकार सेवा केंद्राचे उदघाटन शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते करण्यात आले.प्रथम दत्त क्रुपा प्रोड्युसर क्रुषीप्रोड्युसर कंपनीचे कार्यकारी संचालक अशोक दातिर सर यांनी प्रास्ताविकात कंपनीने कार्याची गरुडझेप कशी घेतली याची सविस्तर माहिती सांगितली. विद्यमान आमदार यांचे नाव न घेता माजी आमदार चंद्रशेखर पाटील घुले म्हणाले की हे क्रुषीसेवा केंद्र राजकारणापायी कुणीतरी हिसकावून घेन्याचे प्रयत्न करीत होते ते आम्ही होउ देणार नाही आम्ही सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.तर शेवगावच्या जनशक्ती टेक्स्टाईल मिलचे संस्थापक अँडव्होकेट शिवाजीराव काकडे म्हणाले की या कंपनीच्या स्थापनेचा मी साक्षीदार आहे. जीद्द,निष्ठा आणि चिकाटीच्या जोरावर दातिर सरांनी हे वैभव प्राप्त केले आहे.या कार्यक्रमासाठी जेष्ठ नेते राजुमामा तागड,काकासाहेब नरवडे, क्रुषीसेवा क्षेत्रातील जी.के.वाघसाहेब, एम.बी.लोंढे, संदिप दरवडे,डी.एन. बुचकुल साहेब, गणेश बुचकुल,सुधाकर आल्हाट,दादासाहेब निकम, मच्छिंद्र राउत,ओंकार जमधडे, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश दातिर,ह.भ.प.दिवटे महाराज, यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक मांन्यवर मंडळी उपस्थित होते.संतोष दातिर यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button