Aurangabad

भामट्यांनी पोलिसालाच घातला ऑनलाइन लाखोंचा गंडा…

भामट्यांनी पोलिसालाच घातला ऑनलाइन लाखोंचा गंडा…

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : बँक खात्याची अचूक माहिती देत निवृत्तसहायक फौजदाराला भामट्याने सव्वालाखाला गंडवल्याचा प्रकार शहरात समोर आला आहे. हा विशेष म्हणजे निवृत्त सहायक फौजदाराच्या खात्यातून तीनवेळा ही रक्कम लांबवण्यात आली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या मोटार परिवहन विभागातील निवृत्त सहायक फौजदार अमरसिंग चौधरी यांच्या मोबाइलवर सायंकाळी पाचच्या सुमारास भामट्याने संपर्क साधला.

त्यावेळी त्यानेएसबीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगत त्यांच्या मिलकॉर्नर येथील वेतन खात्यातील रकमेची अचूक माहिती सांगितली. त्याचसोबत त्याने खाते अपडेट करायचे असल्यामुळे मोबाइल क्रमांक लिंक करायचा आहे.

मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक सांगा असे म्हणाला. त्यामुळे चौधरी यांचा भामट्यावर विश्वास बसला. चौधरी यांनी मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक सांगताच अवघ्या काही मिनिटात त्यांच्या खात्यातील एक लाख आठ हजार ९९८ रुपये भामट्याने लांबवले. हा प्रकार उघडकीस आल्यावर चौधरी यांना धक्का बसला.

त्यानंतर चौधरी यांच्यातक्रारीवरुन सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button