Rawer

निंभोरा गावाच्या सांडपाण्याच्या विल्हेवाटसाठी योजना कार्यान्वित होणार

निंभोरा गावाच्या सांडपाण्याच्या विल्हेवाटसाठी योजना कार्यान्वित होणार

संदिप कोळी रावेर

रावेर : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी गावांना कुटुंब संख्येच्या आधारावर निधी देण्याचे धोरणच आहे त्यामुळे
निंभोऱ्यासाठी स्वतंत्र योजना कार्यान्वित होण्यासाठी मंत्रालयस्तरावरून निधी मिळवून दिला जाईल,असे आश्वासन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी गावाच्या शिष्टमंडळाला दिले.

निंभोरा येथील गावाचे सांडपाणी सिगनूर गावाच्या रेल्वे फाटकाजवळ असलेल्या रुळाखालील पुलाजवळ रेल्वेने अडवून ठेवल्याने सर्व सांडपाणी या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात जाते.सुमारे ७५-१०० हेक्टर शेतजमीन यामुळे कायम बाधित असून नुकसान होत असल्याने सांडपाण्याची कायस्वरूपी विल्हेवाट लावणारी उपाययोजना व्हावी,अशी मागणी घेऊन निंभोरा येथील विविध पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची मुक्ताईनगर येथे भेट घेतली.लेखी निवेदन देऊन गावाची समस्या मार्गी लावा अशी कळकळीची विनंती यावेळी करण्यात आली.

रावेर तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्येचे मोठे गाव असल्याने येथे गावाच्या विस्ताराच्या मानाने सांडपण्याची विल्हेवाट लावणारी योजना यापूर्वीच का झाली नाही ? असा सवाल करत खडसे यांनी लवकरच योजना कार्यान्वित करून मंत्रालयस्तरावरून भरघोस निधी मिळवून दिला जाईल,असे नमूद केले.

निंभोरा गावाची सर्वात मोठी डोकेदुखी व बहुप्रलंबीत असलेल्या सांडपाण्याच्या समस्येवर कायस्वरूपी तोडगा निघावा म्हणून उपाययोजना होण्यासाठी निंभोरा सरपंच सचिन सुरेश महाले,माजी उपसरपंच व ज्येष्ठ पत्रकार विवेक ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस वाय.डी. पाटील, ग्रामपंचायत सदस्या निर्मलाबाई तुकाराम कोळी,शाहीनबी खाटीक,मिनाज अकिल खाटीक यांच्या वतीने संदीप कोळी, दस्तगिर सत्तार खाटीक,शाहरुख आझाद खाटीक,सामाजिक कार्यकर्ते राहुल जीवन सोनार व गौरव विवेक ठाकरे यांनी नाथाभाऊ यांची भेट घेत लेखी मागणी केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button