Amalner

अचानक कुत्रा समोर आल्याने पातोंडा येथे रिक्षा झाली पलटी, चार जखमी… आरोग्य केंद्रात कर्मचारी नसल्याने संतप्त जमावाचा घेराव…

अचानक कुत्रा समोर आल्याने पातोंडा येथे रिक्षा झाली पलटी, चार जखमी…

आरोग्य केंद्रात कर्मचारी नसल्याने संतप्त जमावाचा घेराव…

अमळनेर:- चोपडा अमळनेर रस्त्यावर संध्याकाळी चार च्या सुमारास पजिओ रिक्षा जात असतांना अचानक कुत्रा आल्याने पलटी झाली. यावेळी रिक्षात एकूण आठ जण होते. त्यातील चार प्रवासी जखमी झाल्याचे समजते. जखमींना न्यु प्लॉट भागातील तरुणांनी पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले मात्र आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी नसल्या कारणाने शेकडोचा जमाव जमला होता.
अमळनेर रस्त्यावर मोटर सायकल गँरेज जवळ चोपडा कडून रिक्षा आठ जणांना घेऊन देवपूर धुळे कडे जात असताना. अचानक या रिक्षा मध्ये कुत्रा आला. यावेळी पावसामुळे रस्ता ही ओला होता. यावेळी रिक्षा चालकाने अचानक ब्रेक लावल्याने चालती रिक्षा पलटी झाली. यावेळी गँरेज जवळ पातोंडा येथील न्यु प्लॉट भागातील काही तरुण बसले होते. त्यांना रिक्षा पलटी झाल्याचे समजल्यावर त्यांनी रिक्षा कडे धाव घेतली. यावेळी सर्व आठ प्रवासी रस्त्यावर पडले होते. त्यातील चार जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. प्लॉट भागातील तरुण सर्व जखमींना पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले. मात्र येथे डॉक्टर सह एकही कर्मचारी नसल्याने गावातील लोकांचा रोष वाढला व संताप व्यक्त केला. बघता बघता शेकडो चा जमाव यावेळी जमला होता. जमावातील काही लोकांनी डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना फोन ही लावले. तरीही एकही हजर झाले नाही. जखमींना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने शेवटी १०८ ॲम्बुलन्स ने पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवल्याचे समजते.

प्राथमिक आरोग्य केंद्र हे रोज दुपारनंतर बहुतेक वेळी बंदच असते. येथील कर्मचारी ही राहत नाही. यामुळे अचानक काही घटना झाल्यास पेशंट ला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळी भयानक परिस्थिती असते. कायम कर्मचारी कमतरता असल्याचे कारण आरोग्य केंद्रा मार्फत सांगितले जाते. तरी येथे कायम स्वरूपी रात्री व दिवसा डॉक्टर व कर्मचारी असावे. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button