Khirdi

निंभोरा येथे लस घेण्यासाठी प्रा.आरोग्य केंद्रात उसळली गर्दी युवकांचे उल्लेखनीय काम वाचण्याजोगे

निंभोरा येथे लस घेण्यासाठी प्रा.आरोग्य केंद्रात उसळली गर्दी युवकांचे उल्लेखनीय काम वाचण्याजोगे
प्रविण शेलोडे खिर्डी
खिर्डी : येथे ज्येष्ठ नागरिक व अन्य व्याधी असलेल्या 45 वर्षावरील नागरिकांना प्रतिबंधात्मक लस देण्याच्या आज दुसरा डोस दिला जात होता यासाठी सकाळी तीन वाजेपासून रांगा लागल्याचे चित्र दिसत होते . मागील एक आठवड्यापासून जिल्ह्यात लसीचा तुटवडा जाणवत होता यामुळे निंभोरा प्राथमिक आरोग्य आज दि.६ रोजी केंद्रात कोवी शिल्ड लस उपलब्ध झाल्याने आज दिनांक ६ रोजी सकाळी तीन वाजेपासून रांगा लावून ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले यादरम्यान काहीसा गोंधळ झाल्याचे चित्र गावातील स्वयंसेवी युवकांना सामाजिक कार्यकर्त्यांना माहिती मिळाली त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने मांडणी केली व त्यानुसार लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना बसण्या करिता खुर्च्या व पिण्याच्या पाण्याचे जार उपलब्ध करून दिले व घटनास्थळावर सर्व युवकांनी लसीकरणाची ही मोहीम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी लक्ष देत लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी नियंत्रण मिळवत व फिजिकल डिस्टन्स पालन करत लाभार्थ्यांना लस लाभ कामी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेत व कोणतीही वशिलेबाजी न करता लोकांना आत घेऊन उत्कृष्टपणे लसीकरणाच्या या कामास हातभार लावला. यावेळी सुनील कोंडे,ग्रा पं सदस्य दिलशाद शेख,मधुकर बिऱ्हाडे,दस्तगिर खाटीक,मिलन कोंडे,हर्षल ठाकरे,चेतन भंगाळे,किरण कोंडे,राहुल महाले,विनोद गोरडकर, ललित दोडके यांसह युवकांनी वेगळा आदर्श निर्माण केला याबद्दल त्यांच्या या सामाजिक कार्याची पंचक्रोशीततुन आलेल्या लाभार्थ्यांच्या आप्तस्वकीयांनी व नागरिकांनी कौतुक केले आहे
निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी दहा वाजेपासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत अपुरे कर्मचारी नसतानाही अविरतपणे एकूण २६७ लसीकरण झाले. विशेष म्हणजे ग्रामीण भागात या आरोग्य केंद्राचा लसीकरणा संदर्भात जिल्ह्यात दुसरा क्रमांक लागला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button