आंबोली

आंबोली चौरस्ता मधील उर्वरित कामे पूर्ण करणार ..आमदार बंटीभाऊ भांगडीया

आंबोली चौरस्ता मधील उर्वरित कामे पूर्ण करणार ..आमदार बंटीभाऊ भांगडीया

आंबोली चौरस्ता यात्रा समारोपीय कार्यक्रम

ज्ञानेश्वर जुमनाके
आंबोली वरून प्रतिनिधी
राष्ट्रसंत व क्रांती भूमीची सेवा करण्याची सेवा करण्याची संधी मिळाली त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे सांगत आमदार बंटीभाऊ भांगडीया म्हणाले की राष्ट्रसंताच्या ग्रामगीता व विचार अमलात आणणे गरजेचे सांगत ग्रामगितेचे विचार नियमित अमलात आणण्याची गरज असल्याचे सांगत ग्रामगीता शेतकरी व सामान्य जनतेच्या स्वाधीन केली . आंबोली येथील 3 कोटी रुपयांचा निधी पर्यटन मधून आणण्याचे आश्वासन देत उर्वरित कामे सुद्धा गोदेडा धर्तीवर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असून गोसेखुर्द पाणी आणण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे . मोखाबर्डी ,गोसेखुर्द चे पाणी मिळणार असून सिंचनासाठी उपलब्ध करून देण्याचे विश्वास व्यक्त करीत लोकशाही उत्सव साजरा करीत म्हणजे निवडणूक दरम्यान जात पात धर्म बघितल्याचा जात असून या क्षेत्रातील मतदार राजांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले .
आंबोली चौरस्ता यात्रा येथील
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोसत्व
मधील कार्यक्रमात आमदार बंटीभाऊ भांगडीया बोलत होते .
यावेळी हभप श्याम काळे महाराज, राजू देवतळे, डॉ श्यामजी हटवादे ,राजु झाडे ,मनिष तुम्प्लिवार,
संजय कुंभारे भूषण सातपुते बंडू भाऊ जावळेकर ईश्वर डुकरे अरविंद राऊत पस सदस्य प्रदीप कामडी प्राचार्य डॉ जाने ,अतकरे गुरुजी ,भांडारकर ,अवि बारोकर आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Back to top button