Kolhapur

विमानतळ विस्तारीकरणासाठी लागणार्या अतिरीक्त जमीनीच्या भुसंपादनाची प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत पुर्ण! प्रा. डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी

विमानतळ विस्तारीकरणासाठी लागणार्या अतिरीक्त जमीनीच्या भुसंपादनाची प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत पुर्ण! प्रा. डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी

कोल्हापूर तुकाराम पाटील

विमानतळ विस्तारी करणासाठी लागणार्या अतिरीक्त जमीनीच्या भुसंपादनाची प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत पुर्ण करा. तसेच tv विमानतळाच्या विस्तारीकरणामध्ये येणारे अडथळे संबंधित सर्व विभागांनी आपापसात समन्वय साधून दिलेल्या कालमर्यादेत दुर करावेत अशा सक्त सुचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. विमानतळ विस्तारीकरणाबाबत आयोजीत केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी राज्य सरकारने, ६४ एकर जमीन संपादित करण्यास दहा कोटी रुपयांचा निधी नुकताच दिला आहे. त्यामुळे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी वेग आला आहे. याबाबतचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीला आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋुतूराज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे महावितरणचे अधिक्षक अभियंता अंकूर कावळे आदी उपस्थित होते.
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाला वेग आला असून त्यामध्ये नाईट लँडिगची कामे, धावपट्टी विस्तारीकरण, बागकाम, यासह अन्य महत्वाची कामे सुरू आहेत. मात्र विस्तारीकरणासाठी येणारे अडथळे लवकरात लवकर दुर व्हावेत यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत उर्वरीत कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये ऑबस्टॅकल लाईट, महावितरणचे सब स्टेशन, होर्डींग्ज काढणे, तामगाव रोड व विमानतळ रस्त्याचे रूंदीकरण करणे या प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली.
विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया यांनी विस्तारीकरणामध्ये येणाऱ्या अडचणींची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांना दिली. त्यानंतर विस्तारीकरणामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी संबंधीत विभागांनी, येणारे अडथळे निश्चित केलेल्या कालमर्यादेत दूर करू असे आश्वासन दिले.
त्यानंतर नामदार सतेज पाटील यांनी, ज्या अडचणी ज्या विभागाच्या कक्षेत येतात त्यांनी आपापसात समन्वय राखून लवकरात लवकर दूर कराव्यात अशा सुचना केल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या शब्दानुसार वेळेत काम पुर्ण केले नाही तर त्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्याचबरोबर शासनानं ६४ एकर जमीन संपादित करण्यास दहा कोटी रुपयांचा निधी नुकताच दिला आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करा असा आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना दिला.
सध्या सुरू असलेली कामे व यापुढे करण्यात येणारी उर्वरीत कामे करताना त्यांच्या दर्जाशी तडजोड करू नये. त्याशिवाय विमानतळ विस्तारीकरण प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षताही ज्या त्या अधिकाऱ्यांनी घ्यावी असे नामदार पाटील यांनी सांगितले.
या बैठकीला महावितरणचे अंकूर कावळे, पॉवरग्रिडचे हिमांशू रावत, महापारेषणचे डी एम महाजन, ग्रामविकास अधिकारी बी डी कापसे, पीडब्ल्यूडीचे उप अभियंता डी आर भोसले, व्ही एन पाटील, सुभाष मोरे, यांच्यासह इतर सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button