Maharashtra

सत्ताकारणातील आडवाटा संपणार कधी?

सत्ताकारणातील आडवाटा संपणार कधी?

प्रा राजा जगताप
मी पुंन्हा येईन..!
निवडणूकाच्या प्रचाराच्या फडात, ठासून डरखाळी फोडणारे, मुख्यमंञी मा.फडणविस साहेबांचा आवेश निकाल लागताच …राहिला नाही.कमळ कोमेजले…वाघ सातत्याने डरकाळी फोडतच… मुख्यमंञीपदावर अडून राहिला…!आमचं लोकसभेला अमितभाई शहा यांच्याशी फिप्टी —फिप्टी ठरलय!अडिच —अडिच वर्षे मुख्यमंञी पद आणि सत्तेत समान वाटा देत असाल तरच बोलायला या.उध्दवजी ठाकरे साहेबांनी सांगितले.तर आसं ठरलच नव्हतं.मा.फडणविस साहेब म्हणाले आणि मा.ऊध्दवजी साहेबांचा संताप वाढत गेला.मला लबाड ठरवलं जातय आसं त्यांनी जारिर बोलूनही दाखवलं. युतीचा पोपट पिंज—यात मेला होता.पण जाहिर कोणी करायचं.हे ठरत नव्हत.भाजपा सरकार स्थापन करायला असमर्थ ठरल्यावर.शिवसेनेला सरकार स्थापन करायला कमी वेळ मिळाला…!त्यांच्या मदतीला घड्याळ आणि हात तयार झाले पण १४५चा आकडा जुळवायला त्यांना त्या वेळेत, मेळ जमलाच नाही.नंतर घड्याळवाल्यांना सरकार स्थापायला बोलावलं पण त्यांना दिलेला २४तासाचा वेळ कमी पडला.आठरा दिवसातही कोणीही सरकार स्थापन करू शकत नाही म्हणल्यावर दि.१२/११/१९रोजी दुपारीच राज्यपाल महोदयांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आणि सायंकाळी राज्यात राषट्रपती राजवटीची नामुश्की ओढवली आणि तमाम जनता राज्यातील नेत्यावर नाराज झाली.बावीस दिवस झाले तरी सत्ताकारणातील आडवाटा संपायला तयार नाहित..

२४आॅक्टोंबर २०१९च्या दिवशी. विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले आणि भाजप,शिवसेना व मिञपक्षांच्या महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने स्पष्ट कौल दिला. भाजप—सेनेच्या कार्यकर्त्यात आनंद पसरला .पण तो औट घटकेचाच ठरला! भाजपा स्वता १०५, आणि अपक्ष मिळून ११९शिवसेना ५६आदिक अपक्षासह ६४असे महायुतीचे बलाबल झाले पण शिवसेनेचा आकडा विसंगती सांगणारा वाटायला.शिवसेनेच्या जागा घटल्या त्या कोणामुळे?प्रश्न पडला .पण यामध्ये भाजपाचे २२०जागेचं स्वप्न भंगलं …!एक्झिटपोल करणारे व २४तास. तेच पोल दाखवणा—या वाहिन्या तोंडघशी पडल्या या पोलवाल्यांनी काॅग्रेस ,राषट्रवादी यांना खुपच कमी लेखले होते.त्यात काँग्रेस ४४ राषट्रवादी ५४ असा त्यांना कौल मिळाला.आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांची सातारच्या पावसातल्या सभेची चर्चा रंगु लागली…!सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही विरोधी बाकावर बसणार असे वारंवार ठासून मा.शरदचंद्रजी पवार साहेब सांगु लागले.

एका बाजुला भाजप व शिवसेना म्हणजेच महायुतीचे सरकार स्थापन होईल.भाजपवाले दावा करायला लागले.शिवसेना आमचाच मुख्यमंञी होणार म्हणून, मा.खासदार संजयजी राऊत प्रत्येक दिवशी सांगू लागले.
त्यात परतीच्या पावसाने राज्यात थैमान घातले.विदर्भ,कोकण,प.महाराष्ट्र ,मराठवाडा पावसाने धुऊन निघाला.शेतकरी हैरान झाले.त्यांना अश्रू आवरता येईना.पीकांचे प्रचंड नुकसान झाले.ऐन दिवाळीच्या सणातच बळीराजा कष्टी झाला.माञ दिवाळीचे कारण देत भाजपा,सेना सत्तास्थापनेचे कारण द्यायले.आम्हाला विरोधात बसायचे आहे म्हणून शरदचंद्रजी पवार साहेब पावसातच नाशिकच्या बागांचे,पिकांचे झालेले नुकसान पहायला दौ—याला निघाले…! ते पावसात पळताहेत असे वाटताच…

राज्याचे मुख्यमंञी फडणविस साहेब अकोला दौ—यावर,शिवसेनेचे उध्दवजी ठाकरे साहेब मराठवाड्यातील शेतक—यांचे अश्रू पुसायला थेट शेतक—यांच्या बांधावर!
जनतेला समाधान वाटायले.नेते आपले अश्रू पुसायला बांधावर येताहेत म्हणून शेतकरी जरा धीर धरू लागला. सरकार लवकर बनले जाईल सरकार ओल्या दुष्काळग्रस्थ शेतक—यांना लवकरच मदत करेल जनता आशेने मुंबईच्या मंञालयाकडे पाहू लागले.झालेले नुकसान भरून निघणार नाही असे वाटल्याने आठ,दहा शेतक—यांच्या आत्महत्या झाल्याच्या बातम्या दैनिकातून पहायला मिळाल्या.शेतक—यांच्या पाठीशी आहोत सांगणारे नेते सरकार कांही स्थापन करेनासे झाले!

सत्ताकारणातील आडवाटा …संपेना अखेर दिर्घकाळ गेल्याने भाजपाला राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंञण दिले पण शिवसेना मुख्यमंञी पद मागते आहे पण आंम्ही त्यांना देणार नाही यावर ते ठाम राहिले .भाजपाने असमर्थता दाखवली…!भाजपाचे सुधीरभाऊ रोजच मिडीयाला सांगायचे…”महायुतीचेच सरकार सत्तेवर येईल …लवकरच गोड बातमी कळेल!” वाघाचे जतन आणि संवर्धन कसे करायचे ते मला चांगले जमते,परंतू गोड बातमी आलीच नाही. आणि वाघाचे जतन करण्यात त्यांना यश हि आले नाही”शेवटी त्यांनीच गर्जना केली राज्यात राषट्रपती राजवट येऊ शकते आणि त्यांची वाणी खरीही ठरली.
राज्यातील या प्रमुख नेत्यांनी जनतेची निराशा केली आशा चर्चा शहरातल्या चौकाबरोबरच गावखेड्यातल्या पारावर रंगु लागल्या. ओल्यादुष्काळामुळे…शेतकरी मेटाकुटीला आला! नविन नोकरभरती निघेल म्हणून तरूणाई सुखावली होती ती निराश झाली.नव्या सरकाराकडे अनेकजन आशेने पाहायला लागले.मध्येच शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस—राषट्रवादी तयार झाले कारण भाजपाला सत्तेपासून रोखायचे म्हणून..त्यांच्या बैठकांच्या फैरी झडायला पण सरकार स्थापन करण्यावर तोडगा निघेना समाधानकारक चर्चा सुरू आहे.लवकरच नवे महाशिवआघाडीचे सरकार येईल विविध वाहिन्या बातम्या दाखऊ लागल्या.त्यात भाजपावाले बारिक घटनेकडे लक्ष ठेऊन आहोत सांगायला लागले.त्यातच मुख्यमंञीपदावरून महायुतीचा पोपट मेलाच होता.त्यातच एन.डी.ए.च्या केंद्रसरकारातून मा.मंञी अरविंदजी सावंत साहेब राजीनामा देऊन बाहेर पडले.शिवसेनेला महत्वाच्या ठिकानी हात,व घड्याळवाले पाठिंबा देत नाहित असे लक्षात येताच मा.खासदार संजयजी राऊत साहेब आजारी पडले!
शिवसेनेची दररोज खिंड लढवणारे नेते आजारी पडल्याने मा.उध्दवजी ठाकरे साहेबांनी खिंड लढवली व धिराने त्यांनी आघाडीतील मोठ्या नेत्यांच्या भेटीगाटी घ्यायला सुरवात केली.

महाशिवआघाडीचे सत्तास्थापनेचे चक्र सुरू झाले.यात पेच निर्माण झाला.शिवसेनेचे हिंदुत्व काँग्रेसचे धर्मनिरपेक्षता,राषट्रवादीचे पुरोगामित्व.यावर समानकार्यक्रम यात वेळ जाऊ लागला.पण या सत्ताकारणात राजकारणाची व्याख्या कळायला लागली…
“जे कोणाला सांगायचं नस्तं पण करायचं असतं ते राजकारण!”

आम्ही करतोय ते जनतेच्या भल्यासाठी म्हणायचं पण स्वताच्या पक्षाला मलिदा असणारे मंञीपदं मिळवण्यासाठी अडूण राहायचं हे लपून राहिलेलं नाही.सत्ता जनतेचा विकास करायला हवी म्हणायचं पण स्वताचं हित आणि पक्षाचंच हित जपायचं…!हे या सत्ताकारणात दिसून येत असल्याने राजकारणाचा बट्याबोळ कसा होतो आहे हे दिसू लागले आहे.

महाराष्ट्रराज्याबरोबरच हरियाणातही विधानसभेच्या निवडणूका झाल्या तेथे दिड दिवसात मंञिमंडळ ठरले!अमितभाई शहा साहेबांनी तिढा सोडवला !मग हे आपल्या राज्यात का झाले नाही!मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब व भाजपाचे अध्यक्ष व देशाचे गृहमंञी अमितजीभाई शहा यांनी २४तारखेलाच सांगितले होते महाराष्ट्रात आमचे देवेंद्रजी फडणविसच मुख्यमंञी होतील!
त्याचवेळी शिवसेना आमचाच मुख्यमंञी होणार!सामनातून आरडून सांगत होती .पञकार परिषदेतून रोजच संजयजी राऊत साहेब सांगत होते.हा तिढा सोडवण्यासाठी भाजपाचे दिल्लीतील नेते राज्यात जर आले असते तर कदाचित सत्तास्थापना झाली असती.सत्ताकारणातील आडवाटा या स्वताहून या राजकीय पक्षांनी कृतीमरित्या तयार केल्या आहेत.स्वताच एकमेकांना सत्ताकारणात आडवाटा निर्माण केल्या आहेत.

जनतेने महायुतीला सत्तास्थापनेचा कौल दिला होता तर महाआघाडीला विरोधात सन्मानाने बसण्याचा कौल दिला होता…यात जनता जिंकली व नेते हरले!असे म्हणता येऊ शकते.
महाशिवआघाडी तरी लवकर सत्तास्थापन करेल असे चिञ तयार झाले होते माञ तेही चिञ स्पष्ट होत नाही काॅमन फाॅर्मेला बनवावा लागेल या वाक्याखाली आगामी महानगरपाली,नगरपरिषदा,जिल्हा परिषदा,पुढच्या निवडणूका यावर यांच्या चर्चा सूरू आहेत.

यांच्या वारंवार बैठका होत आहेत परंतु सत्तास्थापनेचा मुहुर्त यांचा ठरत नसल्याने राजकारणाचा नुसता तमाशा झाला आहे का?असे जनता म्हणत आहे.
एकमेकांना शह देणे हे राजकारणात होतच असते.एकमेकांवर दबाव ,टिका होतच असतात तरिही जनतेसाठी व राज्याच्या विकासासाठी …युती व आघाडी करणा—या नेत्यांनी दोन पावलं मागे पुढे झाले तरच यातून लवकर मार्ग निघु शकतो.
जनता मते ज्यांना द्यायची होती ती देऊन मोकळी झाली आहे.त्यांना आता आपल्या भल्यासाठी लवकरच सरकार हवे आहे मग ते कोणाचे का असेना.

कारण राज्यातली परिस्थिती फार गंभीर आहे.आपल्या राज्याला प्रगती पथावर घेऊन जायचे असेल तर राजकीय नेत्यांनी वेळेवर भानावर येऊन सरकार स्थापन करावे!जनतेचा अंत पाहू नये.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button