Chopda

प्रशिक्षणार्थी हेलिकॉप्टर कोसळून एक पायलट मयत तर एक जखमी…

प्रशिक्षणार्थी हेलिकॉप्टर कोसळून एक मयत तर एक जखमी…वड्री, ता. चोपडा, जि.जळगाव येथे दुपारी 4.00 वाजे दरम्यान लोकवस्तीच्या दुर शेतात हेलिकॉप्टर कोसळले असुन एक व्यक्ती मयत झाली असल्याची घटना घडली आहे. माहिती आहे.तहसीलदार चोपडा व पोलिस अधिकारी घटनास्थळी ऊपस्थित असुन मदत व बचाव कार्य सुरु आहे.
तालुक्यातील विष्णापूर पासून जवळच असलेल्या पहाडी भागात प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची घटना आज दुपारी घडली आहे. शिरपूर एअरपोर्टचे शिकाऊ विद्यार्थ्यांसाठी असलेले हे विमान आहे. या घटनेची माहिती मिळताच अडावद पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील आदिवासी बांधवांनी गर्दी केली आहे. या घटनेत महिला पायलट जखमी झाली असून एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button