Amalner

बहुचर्चित लफडं या चित्रपटाचे पोस्टर लॉन्चिंग…

बहुचर्चित लफडं या चित्रपटाचे पोस्टर लॉन्चिंग…

आपल्या खानदेशातील पारोळा येथील रहिवासी श्री महेश थोरात यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या लफडं या चित्रपटाचे पोस्टर लॉन्चिंग व कलाकार परिचय यासंदर्भात एका शानदार कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 24 /10/ 2021 रविवार रोजी जे आर सिटी हायस्कूल , पोलीस अधीक्षक कार्यालय जवळ, धुळे येथे संपन्न झाले

यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील झालेत व पोस्टर अनावरण सोहळा पार पडला तसेच लफडं या चित्रपटाच्या कलाकारांचा परिचय देखील होणार झाला. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण आपल्या खानदेशातील विविध ठिकाणावर होणार आहे या चित्रपटात बहुतांशी कलाकार हे खानदेशातील असून चित्रपटाचे दिग्दर्शक श्री महेश थोरात हे असून निर्माता श्री महेश थोरात व श्रीमती सीमा साखरकर हे आहेत तसेच असोसिएट दिग्दर्शक सचिन बिऱ्हाडे हे करणार असून गीत संगीत नितीन-प्रसाद टीम यांचा असेल तसेच प्रॉडक्शन श्री चेतन सोनार व भटू चौधरी हे बघणार आहेत लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण होऊन हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्यास सज्ज होत आहे .
खानदेशातील तमाम रसिकप्रेक्षकांना विनम्र विनंती आहे की आपल्या खानदेशातील कलाकारांचा हा चित्रपट आपण सर्वांनी नक्कीच चित्रपट गृहात जाऊन बघावा असे आवाहन महेश थोरात फिल्म प्रोडक्शन व श्रीमती सीमा साखरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button