Latur

भिम आर्मीच्या धसक्याने पोलीस प्रशासनाला आली जाग बरदापुर डॉ बाबासाहेब आंबेडकर विटंबना प्रकरणातील आरोपीला तेलंगाव मधून अटक

भिम आर्मीच्या धसक्याने पोलीस प्रशासनाला आली जाग

बरदापुर डॉ बाबासाहेब आंबेडकर विटंबना प्रकरणातील आरोपीला तेलंगाव मधून अटक

प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे

अंबाजोगाई तालुक्यातील बरदापुर मध्ये पोलीस स्टेशन च्या हाकेच्या अंतरावर भर चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची आज्ञाताकडून तोडफोड करून विटंबना केली होती या घटनेचे पडसाद देशासह राज्यातील अनेक गावांत पडसाद उमटले .या वेळी भिम आर्मी भारत एकता मिशन व आंबेडकर चळवळीच्या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कडक कार्यवाही करण्यात यावी .व या आशा समाज विघातक कृत्य करणाऱ्याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे मुख्य सूत्रधार कोण याचा ही शोध घेऊन त्याच्या सह गावाच्या सरपंचावर ही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून लातुर चे भिम आर्मीचे का कर्त्यांनी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी त्यावेळी स्थानिक पोलीस स्टेशनने दोन दिवसात अटक करू आरोपीला ताब्यात घेऊ असे लेखी अश्वासन दिले होते . भिम आर्मीचे कार्यकारणी सदस्य मा अशोक भाऊ कांबळे . भिम आर्मी महाराष्ट्र प्रमुख नेहाताई शिंदे मुंबई अध्यक्ष दिपकजी हनवते उपाध्यक्ष कैलास जैस्वार संघटक जयश्री माई सावर्डेकर सचिव प्रशांत आचार्य संघटक अक्षय धावरे विधानसभा अध्यक्ष विश्वास मोरे वरिष्ठ कार्यकर्ता सुदेश शिंदे बीड जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ मांदळे युवा जिल्हा अध्यक्ष बाबा मांदळे मराठवाडा संघटक विनोद कोल्हे बाबा ढगे बबलू गवळे बबलू शिंदे कार्तिक गायकवाड आदी भिम आर्मीच्या कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे पोलीस प्रशासन हादरले व तेलंगाव येथून आरोपी अटक केल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रा कडून मिळली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button