Nashik

दिंडोरी शहरात लोकनेते स्व.प्रकाशबापू मित्रमंडळातर्फे एकमेव विलगीकरण कक्ष

दिंडोरी शहरात लोकनेते स्व.प्रकाशबापू मित्रमंडळातर्फे एकमेव विलगीकरण कक्ष

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : सद्या भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हीच गरज ओळखून दिंडोरी येथील लोकनेते स्व प्रकाशबापू मित्रमंडळाच्या वतीने समाजसेवा करण्याच्या उद्धशाने बालभारती स्कुल मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांचे संपर्कातील व्यक्तींसाठी विलीगिकरन केंद्र कार्यान्वीत झाले आहे. अशी माहिती युवा नेते प्रितम देशमुख यांनी दिली.
दिंडोरी पंचायत समितीचे लोकप्रिय माजी सभापती स्व.प्रकाश बापू देशमुख यांच्या समाज सेवा विचारांची प्रेरणा व परंपरा व वारसा चालू ठेवण्याचे काम त्यांचे चिरंजीव प्रितम देशमुख करत असून त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन कोरोनाचा महामारीवर जनतेला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
दिंडोरी शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने आणि ज्यांना कोरोनाची लागण होऊन रुग्ण पहिल्या स्टेज आहे परंतु जागेअभावी विलगीकरण करून राहण्यासाठी वेगळी रूम नसेल, असे गरजू नागरिक त्याचा लाभ घेत आहे.
येथील रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना चहा नाष्टा जेवण दिले जात आहे. नाष्टा मध्ये अंडी, बदाम, संत्री दिली जात आहे.
याठिकाणी मनोरंजन साठी टीव्ही लावण्यात आली आहे.रुग्णाना सेवा सुविधा देण्यासाठी अनेक जण पुढे येत आहे तरी ज्यांना अगदी पहिल्या स्टेज ला कोरोना झाला आहे जे घरी राहून उपचार करू शकतात किंवा त्यांचे संपर्कातील नागरिकांना काही दिवस वेगळे राहणे आवश्यक आहे परंतु त्यांना घरी व्यवस्था नाही त्यांनी लोकनेते स्व.प्रकाश बापू मित्रमंडळ संचालित बालभारती स्कुल मधील विलगीकरण कक्षाचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.
बालभारती संस्थेला मोठ्या प्रमाणात कोविड सेंटर सुरू करून नफा कमविण्यासाठी ऑफर आली असतानाही या मित्रमंडळाने कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता ती ऑफर धुडकावून लावली. स्वता व लोकसहभागातुन रुगणासाठी व नागरिकांसाठी जनसेवा करायची असे ठरविले व विलगीकरण कक्ष स्थापन केले.यासाठी प्रितम देशमुख डॉ,विलास देशमुख, संदीप शेटे, सुयोग धोंगडे. कादवाचे माजी संचालक भाऊसाहेब देशमुख ,अमोल देशमुख ,नयन बुरड, अविनाश ताडे,दिंडोरी शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती आदी विशेष परिश्रम घेऊन कार्य करत आहे.
गरजुनी लाभ घेण्यासाठी
*प्रितम देशमुख 98236 80555*
*डॉ विलास देशमुख 98903 06101 संदीप शेटे 9923389290 अमोल देशमुख 9923076788 यांच्याशी संपर्क साधावा.*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button