Nashik

गोदावरी नदी पात्रात वऱ्हाडाची गाडी पुलावरून कोसळल्याने दोघांचा मृत्यू तर आठ जण जखमी,नांदुरमध्यमेश्वर येथे झाला अपघात.

गोदावरी नदी पात्रात वऱ्हाडाची गाडी पुलावरून कोसळल्याने दोघांचा मृत्यू तर आठ जण जखमी,नांदुरमध्यमेश्वर येथे झाला अपघात.

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : सिन्नर येथून विवाह सोहळा आटोपून मुलाचा घराकडे वऱ्हाडी मंडळींना घेऊन येवला तालुक्यातील जळगाव नेवुर येथे आपल्या मुळ गावी निघालेल्या पिकअप व्हॅन नांदूर मधमेश्वर गावाजवळ असणाऱ्या गोदावरी नदी पात्रा वरील पुलावरून खाली कोसळल्याने झालेला अपघात दोन ठार आठ जखमी झाले आहेत सायखेडा पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे येवला तालुक्यातील जळगाव नेवुर येथील उत्तम घुले यांचा मुलगा योगेश यांचा विवाह साठी सिन्नर येथे वराडी गेले होते विवाह सोहळा आटपून ते निफाड सिन्नर मार्गाने येवला तालुक्यातील जळगाव नेवुर ह्या गावाकडे निघाले होते तेव्हा गोदावरी नदीवर पिकअप चालकांचे नियञंण सुटल्याने पिकअप व्हॅन एम एच ०८ एच ५७९८ गाडी थेट गोदावरी पाञात कोसळून ही दुर्दैवी घटना घडली नदीमध्ये पिकअप कोसळलीचे दिसताच त्या ठिकाणी मासेमारीसाठी असलेल्या विशाल मोरे यांनी नदीत उडी घेत यातील पंधरा लोकांना गोदावरी नदी पाण्यातून बाहेर काढले रमजान शेख व सोमनाथ कुराडे यांनी मदत केली सायखेडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन क्रेनच्या साह्याने पिकअप बाहेर काढली घटनास्थळावरून जखमी ना निफाङ येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मधुकर कारभारी घुले वय वर्षे ५५ जळगाव नेवुर ता येवला तर सई विकास देवकर वय वर्षे सहा श्रीरामपुर यांचा मृत्यू झाला असुन ह्या अपघातात भागुबाई रावसाहेब घुले वय वर्षे ६०,भास्कर कारभारी घुले वय वर्षे ६०,देवीदास बाबुराव घुले वय वर्षे ४५,पिकअप चालक आकाश सोनवणे वय वर्षे २५,अशोक घुले वय वर्षे ६०,किरण तांबे वय वर्षे २१,रोहिणी बाबासाहेब घुले वय वर्षे ३० जखमी झाले आहेत व पोलीस पाटील गोरक्षनाथ वाघ खाणगांव येथील पोलीस पाटील दौंड व विजय डांगळे यांच्यासह ग्रामस्थांनी मदत कार्य केले यातील जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे ह्या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अशिष अडसूळ करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button