sawada

सावदा येथील गट नं. १३४४ च्या जागेवरील नविन इमारतला न.पा.व प्रांत विभागा कडून परवानगीच नाही…! या प्रकरणात अधिकाऱ्यांनी का घेतली धृतराष्ट्राची भूमिका?

सावदा येथील गट नं. १३४४ च्या जागेवरील नविन इमारतला न.पा.व प्रांत विभागा कडून परवानगीच नाही…! या प्रकरणात अधिकाऱ्यांनी का घेतली धृतराष्ट्राची भूमिका?

सावदा युसूफ शाह

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या मौजे सावदा येथे डायमंड ट्रान्सपोर्ट चे मालक शेख हारुन शेख इक्बाल यांच्या मालकीची बिनशेती परवानगी (N.A ) नसलेली गट नंबर १३४४ च्या जागेवर नवीन भव्य-दिव्य ईमारत बेकायदेशीर रित्या संबंधित विभागाची कोणतीच परवानगी न घेता स्वतःच्या समरी पावर मध्ये कायद्याला न जुमानता सदरील इमारत बांधलेली आहे व यासाठी स्थानिक नगरपालिकेकडून तसेच प्रांत अधिकारी फैजपूर कडून सदरील नवीन इमारत बांधकाम करिता कोणतीच परवानगी सुद्धा घेतलेली नाही

सदरची बेकायदेशीररीत्या बांधलेली नवीन इमारत मध्ये सन २०२०-२१ पासून डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सुध्दा चालवली जाणार असून या करीता प्रसिद्ध जाहिरात प्रमाणे विविध विषयांचे २० शिक्षकांच्या भरती व मुलाखती दि.१२/६/२०२१ रोजी या बेकायदेशीर रित्या बांधलेली नवीन इमारत मध्येच घेण्यात येणार आहेत. मात्र सदरील शिक्षक भरतीला संबंधित शिक्षण विभागाची परवानगी सुद्धा नसल्याची धक्कादायक बाब या कोरोना माहामारीच्या काळात उघडकीस आली आहे

ज्या संस्थेद्वारे सदरची शाळा चालवली जाणार आहे त्या संस्थेचे सचिव व गट नं. १३४४ चे जागा मालक शेख हारून शेख इक्बाल हे धनाट्य असून राजकीय दृष्टी प्रभावशाली असल्यानेच बातम्या प्रसिद्ध होऊन ही सावदा न.पा. प्रशासन, प्रांत विभाग फैजपूर, शिक्षण विभाग जि. प. जळगांव, याकडे कानाडोळा करीत असल्याचा विषय गावात चर्चेला जात आहे

*विशेष*

सदरील गट नं १३४४ ची बिनशेती परवानगी नसलेली जागेवर बांधलेली इमारत व शिक्षक भरती, शाळा परवानगी बाबत शेख हारून शेख इक्बाल यांच्याशी सावदा – मसकावद रस्त्यावर समक्ष भेटून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मी जिल्हाधिकारी जळगांव कडून बांधकाम परवानगी घेतलेली आहे आणि वेळ पडल्यास कायद्यात रेगुलाइस करण्याचा प्रावधान आहे राहिला कोरोना काळात शिक्षक भरतीचा विषय तो शिक्षण विभाग व माझा आहे आता माझी तब्येत खराब आहे असे सांगून कारने वेळ मारून निघून गेले

याप्रकरणी आज दिनांक ७ जून २०२१रोजी मुख्याधिकारी यांची भेट घेण्यासाठी सावदा पालिकेत गेलो असता ते नसल्याने येथील रचना सहाय्यक ऐश्वर्या पिंगळे यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी बिनशेती परवानगी नसलेल्या गट नं.१३४४ वरील अवैधरीत्या बांधलेली इमारत बाबत त्यांना प्राप्त टाऊन पलांनिंग जळगाव चा पत्र, जागा मालकांचा अर्ज, इमारत नकाशा व्यतिरिक्त कोणतेही रीतसर कागद व प्रस्ताव सदरील जागा मालकांनी पालिकेस सादर केलेले दिसत नाही मुख्याधिकारी साहेब आल्यावर त्यांना सर्व सांगून योग्य रीत्या कायदेशीर नोटीस बजावण्याचे संगीतले आहे

म्हणून या प्रकरणा बाबत खरे काय खोटे काय हे समोर आणण्याकरिता लवकरच शिक्षण अधिकारी बी.जे पाटील सह सदरील जागेवर अवैधरित्या बांधलेली नवीन इमारत संदर्भात इतर संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली जाणार असून पुराव्यानिशी लेखी तक्रार देखील केली जाणार आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button