Jalgaon

ऑगस्ट महिना आणि उन्हाचा तडाखा ऑक्टोबर हिट सारखा…!जिल्ह्यात पावसा ऐवजी ऊनच जास्त..!

ऑगस्ट महिना आणि उन्हाचा तडाखा ऑक्टोबर हिट सारखा…!जिल्ह्यात पावसा ऐवजी ऊनच जास्त..!

जळगाव जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून उन्हाचा तडाखा मोठया प्रमाणात वाढला आहे. गेल्या 15 दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे.सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण सरी कोसळण्या ऐवजी ऊन पडत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसात जिल्ह्यातील तापमानातील पारा हळूहळू वाढत आहे. आज किमान तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे पिकांना जीवनदान मिळाले होते. परंतु गेल्या 15 दिवसापासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तापमान वाढलं आहे.
किमान आणि कमाल तापमानात सरासरी 3 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे. दिवसा प्रखर ऊन तर रात्रीही उकाडा जाणवत आहे. त्यामुळे ऑगस्टमध्येच ऑक्टोबर हिट जाणवत आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत ऑगस्ट महिन्यात आणि त्यातल्या त्यात श्रावण महिना सुरू असताना सरासरी तापमान हे २५ ते 30 अंशांपर्यंत असत. पण आता पाऊस थांबल्याने तापमानात वाढ झाली आहे.

ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता..

राज्यात पाऊस कमी झाला असला तरी त्यामुळे हिमालयात येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. या अनुषंगाने देशातील आणि राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २५ ऑगस्टपासून अरबी समुद्र आणि बंगालच्या
उपसागरातही वाऱ्याची दिशा बदलण्यामुळे चक्रीय स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे
कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस कोसळेल.यामुळे मात्र जळगांव जिल्ह्यात प्रचंड उकाडा व उन्हाला सामोरे जावे लागणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button