Pandharpur

मनसेच्या भव्य महिला मोर्चाने उमरगा दणाणले…

मनसेच्या भव्य महिला मोर्चाने उमरगा दणाणले…

प्रतिनिधी
रफीक आत्तार

पंढरपूर : महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने,प्रदेश सरचिटणीस तथा सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष मा.दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष मा.प्रशांत नवगिरे यांच्या प्रमुख
उपस्थितीत,उपजिल्हाध्यक्ष मा.अविनाश साळुंके यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२१.१०.२० रोजी उमरगा येथे बचत गटांच्या महिलांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटात संपूर्ण जग सापडले असून,सरकारने लाॅकडाऊन सुरू केले आणि लोकांचे उद्योग धंदे बंद पडले.हातावरचा पोट असणार्यांना दररोजचा चरितार्थ चालविणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत सर्वत्र मायक्रो फायनान्स च्या वसुली अधिकार्यांनी महिला बचत गटांतील महिलांना कर्ज वसुली साठी तगादा लावून सक्तीने कर्ज वसुली चालुच ठेवली होती. जिथे खायचे वांदे तिथे कसले कर्ज फेडणार? असा गंभीर प्रश्न बचत गटांतील महिलांना पडला होता.ही बाब मनसेच्या सरचिटणीस मा.दिलीप बापू धोत्रे यांच्या लक्षात येताच त्यांनी या महिलांना एकत्र करून मायक्रो फायनान्स व बॅंका यांच्या सक्तीच्या वसुली विरोधात व सरकारने महिला बचत गटांच्या महिलांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी.यासाठी पंढरपूर व लातूर येथे महिलांचा महामोर्चा नुकताच काढला होता.याची गंभीर दखल घेऊन पुणे विभागीय आयुक्त यांनी सक्तीची वसुली करू नये याबाबत आदेश काढले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स व बॅंकांनी आपली सक्तीची वसुली सुरूच ठेवली होती. यामुळे त्यांना वठणीवर आणण्यासाठी आज या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला उमरगा तालुक्यातील बचत गटांच्या हजारो महिला उपस्थित होत्या.मोर्चा यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष हरी जाधव, शहराध्यक्ष हेमंत बनसोडे यांच्या सह शहर व तालुक्यातील मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.यावेळी जिल्हासचिव विश्वनाथ स्वामी, ज्योतिबा येडगे, लोहारा तालुकाध्यक्ष अतुल जाधव हे आवर्जून उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button