Nashik

मानूर (गढीपाडा) येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा भोंगळ कारभार परत एकदा चर्चेला

मानूर (गढीपाडा) येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा भोंगळ कारभार परत एकदा चर्चेला

नाशिक : बागलाण तालुक्यातील गेल्या वर्षभरापासून (लॉकडावून दरम्यानचा पूर्ण काळ) चर्चेत असलेला विषय म्हणजे रेशन दुकानदाराचा भोंगळ कारभार पुन्हा चर्चेला येत आहे. या गावात मागील एक ते दोन महिन्याचे लोकांनी ऑनलाइन प्रणालीवर रेग्युलर थंब देऊन रेशनिंगच्या पावत्या काढल्या असून देखील ह्या रेशन लाभार्थ्यांना धान्य मिळाले नाही? याविषयी गेल्या वर्षी देखील सोसिएल मीडिया, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मानूर, गढीपाडा चर्चेत आले होते. गावातील लोकांनी या दुकानदाराविरुद्ध बागलाण तहसिल कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवली होती तसेच वेगवेगळ्या न्यूज चॅनेल च्या माध्यमातून देखील बातम्या छापून आल्या. त्यानंतरुन काही काळ उलटला असता आता परत एकदा या रेशन संदर्भात लेखी तक्रार घेऊन दि.०१/०२/२०२१ रो. काही गावकरी मंडळींनी थेट बागलाण तहसील कार्यालय गाठले व संपूर्ण पुराव्यानिशी सविस्तर निवेदन देण्यात आले. त्या ठिकाणी बागलाण तालुक्याचे मा.भामरे साहेब(पुरवठा अधिकारी) यांनी रेशन लाभार्थ्यांची तक्रार घेऊन मागील बाकी असलेल्या सर्व महिन्याचे धान्य मिळेल असे आश्वासन दिले होते. परंतू आज काही लाभार्थी रेशन घेण्यासाठी स्वस्त धान्य दुकानावर गेले असता रेशन दुकानदाराने अरेरावी, शिवीगाळ करून, दुकानाला कुलूप लावून निघून गेले, लाभार्थ्यांनी कोणताही वाद न घालता आमच्या हक्काचे एक ते दोन महिन्याचे धान्य द्या. असे सांगितले असता त्यांनी खालील उत्तरे दिलेमागील कोणत्याच महिन्याचे धान्य मिळणार नाही, तुम्हीं कोणाकडेही तक्रार करा माझे काहीच होत नाही, आणि मला हे रेशन चालवायला परवडत देखील नाही तुम्हांला जे करायचे ते करून घ्या अशा स्पष्ट भाषेत लाभार्थ्यांना उत्तर दिले. मग असे गरीब आदिवासी लोकांच्या जीवावर उठणारे रेशन दुकान चालक शासन ठेवतात तरी कशाला? आता एक ते दोन महिन्याचे धान्य मिळेल तरी कधी? असा प्रश्न देखील उपस्थित होतो.
या नेहमीच्या तक्रारीला तालुका स्तरावरुन गेल्या एक वर्षपासून अधिकाऱ्यांच्या काहीच प्रतिक्रिया नाही? पुरावे असतांना देखील रेशन चालकावर आद्यप कारवाई का नाही? तालुक्याचे अधिकारी आतातरी लक्ष देतील का? लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीवर थंब देऊन लगेच रेशन मिळेल का? याचा अर्थ रेशन चालकाला शासन पाठीशी घालतय का? साहेब आता तुम्हींच सांगा आम्हांला न्याय मिळेल का?
अशा एकणानेक प्रश्न आज मानूर ग्रामस्थांच्या मनात उपस्थित झाले आहेत. रेशन दुकान दाराच्या या नेहमीच्या हलगर्जीपणा मुळे रेशन धान्य साठी किती दिवस अजून वाट पाहावी लागेल. याची शासन दरबारी काय कार्यवाही होते याकडे मानूर गावकरी मंडळी यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button