Faijpur

फैजपूरचे कलाशिक्षक राजू साळी,यांच्या घरी संत गोरा कुंभार गणपतीची आरस”

फैजपूरचे कलाशिक्षक राजू साळी,यांच्या घरी संत गोरा कुंभार गणपतीची आरस”

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : सर्व दूर गणेश चतुर्थीला गणपतींची स्थापना करण्यात आली गणपती बुद्धीची देवता चौदा विद्या चौसष्ट कला वैदिक धर्मातील प्रथम उपासक पूजेचा मान गणपतीला दिला जातो.गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता विघ्नाचा नियंत्रक मानला जाणारा शुभ कार्यासाठी गणपतीची पूजा केली जाते.संपूर्ण भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे,विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची स्थापना जास्त प्रमाणात केली जाते.फैजपूर येथील राजू साळी,श्री.एस.बी.चौधरी हायस्कूल, चांगदेवचे कलाशिक्षक यांनी जसा कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन कलाकृती तयार करत असतो.या संकल्पनेच्या आधारे “संत गोरा कुंभारच्या रूपाने पर्यावरण पूरक गणपती मूर्ती व देखावा बनवून विधीवत स्थापना करण्यात आली.गणपतीची आरस बनविण्यासाठी बांबूच्या कामट्या पासून पुरातन सेट तयार करण्यासाठी दहा ते पंधरा दिवस लागले,सदर देखावा बघितल्यावर रामायण सिरीयल मधील एखादा सेट बघत आहोत.असा भास निर्माण होतो,”संत गोरा कुंभार गणपतीच्या मूर्तीला” राजू साळी यांनी रंगकाम केलेले असून मूर्ती हि विलोभनीय देखणी आहे,संत गोरा कुंभार रूपातील गणेश मुर्ती बनविण्याचा उद्धेश असा की,कुंभार मातीत चिखलात राहून खूप मेहनत करून आपल्या कुटूंबाचा उदर निर्वाह भागवण्यासाठी चाकावर सुंदर कलाकृती निर्माण करीत असतो.आपल्या सर्वांसाठी पाणी पिण्याच्या मटक्या पासून ते दिवाळीचे दिवे असो अश्या असंख्य घरगुती वस्तू निर्माण करीत असतो.सदर देखाव्याचे सर्वदूर कौतुक होत असून त्याच्या राहत्या घरी बालगोपालांची चंगळ होत आहे.राजू साळी यांनी बाप्पाकडे भारताला कोरोना महामारीतून मुक्त कर,व सर्व संकटांचे निवारण कर,असे साकडे घातलेले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button