Pandharpur

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार समाधान आवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार समाधान आवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपूर येथील विश्रामगृह येथे उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली व पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत घेण्यात आली, यावेळी कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर उपाय करण्यासाठी वैद्यकीय सेवा आणि त्यासाठी असणाऱ्या औषधाचा पुरवठा रुग्णसेवेसाठी आवश्यक असणे गरजेचे असल्याचे आमदार आवताडे व आमदार परिचारक यांनी प्रांताधिकारी गजानन गुरव साहेब व आरोग्य विभागाचे डॉ. बोधले व उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. गिराम यांना सांगितले, तसेच सरकारी व खाजगी हॉस्पिटलमधील बेड संख्या वाढविण्याच्या सूचना दिल्या, आणि तालुक्यातील लसीकरणाबाबत माहिती घेण्यात आली,
आमदार आवताडे यांनी कालच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या बरोबर चर्चा करून पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात औषध गोळ्याचा पुरवठा व्यवस्थित करण्याची मागणी केली व उपविभागीय अधिकारी गजानन गुरव साहेब यांनी कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन आलेल्या नियमावलीची माहिती सांगून त्या पद्धतीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या बैठकीसाठी उपस्थित उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम साहेब, नगरपालिका मुख्याधिकारी माळी सो सार्वजनिक बांधकाम विभागाचे गावडे साहेब, तहसीलदार सुशील बेल्हेकर आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले गटविकास अधिकारी प्रशांत काळे, उपजिल्हा रुग्णालयांचे डॉ.अरविंद गिराम नगरपालिकेचे उपकार्यकारी अधिकारी सुनील वाळुजकर,पोलीस निरीक्षक अरुण पवार, मिलिंद पाटील व मोरे. कॉटेज समितीचे सदस्य,प्रशांत देशमुख, वैशाली पाटील मॅडम डॉ.जोशी व सर्व खात्यातील अधिकारी वर्ग उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button