India

आरोग्याचा मुलमंत्र..नावात कडू असून आरोग्यास गुणकारी “कडुलिंब”

आरोग्याचा मुलमंत्र..नावात कडू असून आरोग्यास गुणकारी “कडुलिंब”

कडुलिंब ही एक भारतीय औषधी वनस्पती आहे. औषधी वनस्पती क्षेत्रातील कडुलिंबाचे वाढते महत्त्व पाहून खूप वर्षांपूर्वीच भारताने या वनस्पतीचे पेटेंट आपल्या नावावर करून घेतले. म्हणून भारतीय वनस्पतीचा दर्जा कडुलिंबाला मिळाला. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे कडुलिंबाचा उपचार केल्यास रक्त, पचन आणि त्वचेशी निगडीत कित्येक असाध्य रोग दूर होऊ शकतात. शिवाय साधा ताप, खाज-खरुज, मच्छर चावणे, इन्फेक्शन आणि जुन्या जखमा भरणे यांसारख्या गोष्टींत सुद्धा कडुलिंब रामबाण ठरते.

१. कडू लिंबाचे पान दात आणि हिरड्यांच्या रोगांना दूर करते.

२. कडुलिंब मध्ये एंटीफंगल गुणधर्म असतात जे फंगल इन्फेक्शन चांगले करतात.

३. कडुलिंबाचे सेवन केल्याने पोटातील आग, बद्धकोष्टता, पोटातील जंतू आणि सूज इत्यादी समस्यांमध्ये आराम मिळतो.

४. पोळणे, त्वचा कापली जाणे व जखम लवकर भरण्यासाठी लिंबाच्या पानांना बारीक करून प्रभावित जागेवर लावावे.

५. लिंबाच्या पानांना उकळून वाफ घेतल्याने अनेक रोगांमध्ये आराम मिळतो.

६. पावसाळ्याच्या दिवसात इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात लिंबाची पाने टाकून आंघोळ करावी.

७. केसांची चमक वाढवण्यासाठी शाम्पू मध्ये थोडे लिंबाचे तेल टाकून केस धुवावेत. असे केल्याने तुमच्या केसांची चमक वाढेल.

८. कडुलिंबाच्या काडीने दात स्वच्छ केल्याने तोंड व पोटासंबंधी असलेले सर्व रोग दूर होतात.

९. वाढलेले वजन कमी करण्यासाठी कडू लिंबाच्या पानांना तूपा मध्ये शिजवून चावून खावे.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथिक तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button