India

आरोग्याचा मुलमंत्र..उन्हाळ्यातील संजीवनी “टरबूज”

आरोग्याचा मुलमंत्र..उन्हाळ्यातील संजीवनी “टरबूज”

उन्हाळ्याच्या दिवसाता शरीराला पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. उन्हात मोठ्या प्रमाणात घाम येत असल्याने घामावाटे पाणी शरीराबाहेर फेकले जाते. त्यामुळेच शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. यावेळी भरपूर पाणी पिण्यासोबतच पाण्याचा अधिकांश असलेल्या फळांचे सेवन करणे आवश्यक असते. या ऋतूत टरबूज खाणे शरीरासाठी हितकारक असते. टरबूजामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. यामुळे डिहायड्रेशन रोखता येते. “यात तब्बल ९५ टक्के पाणी असते. यासोबतच व्हिटामिन आणि मिनरल्सही असतात. हे खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो, म्हणून याला उन्हाळ्यातील संजीवनी सुद्धा म्हणतात.” प्रत्येक मोसमात हे फळ खाल्ले पाहिजे.

– शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी टरबूज खाल्ले पाहिजे. कॅन्सर सेल्स वाढण्यापासूनही टरबूज रोखते.

– जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे तर टरबूज खाल्ल्याने हा त्रास दूर होतो.

– तणाव, ब्लड प्रेशरसारख्या समस्यांमध्ये टरबूज खाणे फायदेशीर मानले जाते.

– सतत लघवीचा त्रास होत असेल टरबूज खाल्ल्याने फायदा होतो. यात मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे पाचन क्रिया सुरळीत होते.

– यात व्हिटामिन ए आणि बीटा कॅरोटिन असते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी फायदा होतो.

– यात अँटी ऑक्सिडंट्स आणि व्हिटामिन सी असते. व्हिटामिन सीमुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.

– डायबिटीज लोकांसाठी टरबूज खाणे फायदेशीर असते. यामुळे शरीरातील साखर नियंत्रणात राहते.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
होमोिओपॅथिक तज्ञ

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button