India

आरोग्याचा मुलमंत्र..नितळ चेहऱ्या साठी काही टिप्स

आरोग्याचा मुलमंत्र..नितळ चेहऱ्या साठी काही टिप्स

चेहऱ्याची त्वचा नितळ व सुंदर दिसावी, यासाठी लोक कित्येक प्रकारचे उपाय करतात. पण कितीही उपचार केले तरी काही जणांच्या चेहऱ्यावर म्हणावे तसे तेज दिसत नाही. या साठीच जाणून घेऊ काही टिप्स

१) गोरे होण्यासाठी हळदीचा उपयोग

भारतीय आयुर्वेदात हळदीला एक जादुई पदार्थ म्हणून संबोधण्यात आले आहे. हळदीमध्ये अँटीबॅक्टरियल, अँटीफंगल आणि त्वचा उजडणारे विशेष घटक असतात. हळदीच्या उपयोगाने चेहऱ्यावरील काळेपणा दूर होऊन त्वचा गोरी व चमकदार बनते. हळद चेहऱ्यावरील पिंपल देखील कमी करण्यात सहाय्यक असते.
हळदीचा मास्क
एका वाटीत दोन चमचे दूध घ्या. या दुधात अर्धा चमचा हळद पावडर मिसळा.
आता दूध व हळद चांगल्या पद्धतीने एकामेकात एकत्रित करा.
यानंतर कापसाच्या एका स्वच्छ तुकड्याच्या मदतीने दूध व हळदीचे हे मिश्रण चेहरा आणि मानेला लावा.
15 ते 20 मिनिट फेसपॅक सुकू द्या.
नंतर कोमट पाण्याने साबण न लावता चेहरा धुवा.
हा फेसपॅक दररोज लावल्याने चेहऱ्यावरील काळपटपणा दूर होऊन त्वचा चमकदार होईल.

२) गोरे होण्यासाठी लिंबू आणि गुलाबजल चा उपयोग

लिंबू सिट्रिक एसिड असते जे त्वचेला हल्के करते तर गुलाब जल त्वचेला थंडावा प्रदान करते. यांना दोघांना मिसळून लावल्याने त्वचेवर उजळपणा येतो.
यासाठी सर्वात आधी एका वाटीत थोडे गुलाब जल टाकावे.
यानंतर गुलाब जल मध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यावा.
कोमल कापसाच्या मदतीने हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे.
नियमित पणे हा उपाय केल्याने चेहऱ्याचा काळेपणा दूर होतो आणि त्वचा ग्लो करायला लागते.

३) गोरे होण्यासाठी मध चा उपयोग

मध त्वचेला मऊ करण्यासाठी उपयुक्त असते. लिंबू मध्ये सिट्रिक एसिड असते जे त्वचेवरील पिंपल्स तयार करणाऱ्या जंतूंना नष्ट करते. मध आणि लिंबू चे फेस पॅक बनवण्यासाठी पुढील पद्धती अनुसरा-
सर्वात आधी एक चमचा मध मध्ये दोन चमचे लिंबू रस मिसळा.
चमच्याच्या सहाय्याने दोन्ही पदार्थ एकामेकात एकत्रित करा.
यानंतर कापसाच्या एका स्वच्छ तुकड्याच्या मदतीने मध व लिंबू रस चे हे मिश्रण चेहरा आणि मानेला लावा.
15 ते 20 मिनिट फेसपॅक सुकू द्या.
नंतर कोमट पाण्याने साबण न लावता चेहरा धुवा.
हा फेसपॅक दररोज लावल्याने चेहऱ्यावरील काळपटपणा दूर होऊन त्वचा चमकदार होईल.

इतर काही टिप्स

• दररोज योग व व्यायाम आणि

योग करण्याचे चमत्कारी परिणाम शरीराला तर होतातच परंतु तुमच्या त्वचेला देखील याचे अनेक फायदे आहेत. त्वचा सुंदर दिसावी म्हणून चेहरा आणि त्वचा संबंधी व्यायाम करावे. सुंदर त्वचेसाठी अधोमुखासान आणि सिंहासन हे काही उपयोगी योग आसान आहेत.

• आरोग्यदाई अन्न खा
आपल्या शरीरात जाणारे अन्न त्वचेवर खूप प्रभाव टाकते. विटामिन ए, ई आणि सी च्या कमतरतेमुळे चेहरा निस्तेज दिसायला लागतो. म्हणून हेल्थी त्वचा ठेवण्यासाठी जास्तीत जास्त फळे आणि पालेभाज्या खाण्याची सवय लावा. पपई आणि गाजर ही एकमेव फळ आहे ज्यात विटामिन सी, ई आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. म्हणून पपई व गाजराचे सेवन आरोग्य आणि त्वचेसाठी खूप उपयोगी आहे.
याशिवाय फास्ट फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने त्वचेवरील किटाणू वाढायला लागतात ज्यामुळे पुळ्या आणि पिंपल ची समस्या होते.

• उष्ण पाण्याने अंघोळ करणे थांबवा

काही लोकांना उन्हाळ्यातही गरम अथवा कोमट पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते. परंतु नित्य गरम पाण्याने स्नान केल्याने शरीरावरील ओलावा कमी व्हायला लागतो. ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडू लागते. म्हणून बरेच स्कीन एक्स्पर्ट गरम पाण्याने अंघोळ टाळण्याची सल्ला देतात. थंड पाण्याने शॉवर व अंघोळ केल्याने शरीर व मन दोघी ताजे होतात.

• नेहमी पाणी पीत जा

दिवसभरात पुरेसे पाणी न पिल्याने शरीर आणि त्वचा रफ व कोरडी होऊ लागते. तुम्ही बऱ्याचदा ऐकले असेल की दररोज 7-8 ग्लास पाणी प्यायला हवे. म्हणून शक्य होईल तेवढे पाणी पीत रहा आणि दिवसभरातून एकदा तरी थोडे कोमट पाणी प्या. असे केल्याने तुमचे शरीरातील रक्त शुद्ध होईल आणि त्वचा हायड्रेट व चमकदार होईल.

डॉ किशोर बाळासाहेब पाटील
{ होमिओपॅथिक तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button